IPL 2022: मुंबईत Prithvi Shaw चं ड्रीम होम, 5 वर्षात IPL मधून कमावलेला पैसा लावला, किंमत ऐकून विस्फारतील डोळे
IPL 2022: दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) सलामीवीर पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) भारतीय क्रिकेट संघात कमबॅक करण्यासाठी जोरदार संघर्ष करतोय. पण इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत मात्र तो हिट आहे.
मुंबई: दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) सलामीवीर पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) भारतीय क्रिकेट संघात कमबॅक करण्यासाठी जोरदार संघर्ष करतोय. पण इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत मात्र तो हिट आहे. आयपीएलमध्ये पृथ्वी शॉ ने बक्कळ पैसा कमावलाय. ही सर्व कमाई त्याने घरासाठी (Home) खर्च केली आहे. घर हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. मायानगरी मुंबईत घर घेणं हे सर्वसामान्य माणसापासून सेलिब्रिटीसाठीही सोप नाहीय. सर्वसामान्य माणसाला मुंबईत घर घेण्यासाठी लाखो रुपयांची तजवीज करावी लागते. कर्ज काढून ते फेडावं लागतं. सेलिब्रिटींसाठी घर घेणं सोप नाहीय. त्यांनाही काही कोटी रुपये खर्च करावे लागतात. पृथ्वी शॉ ने तर मागच्या पाचवर्षातली आयपीएलमधील आपली कमाई घर घेण्यासाठी खर्च केली आहे. आयपीएलमधून मिळालेल्या पैशातून त्याने वांद्रे येथे आलिशान अपार्टमेंट खरेदी केलं आहे.
कार्पेट एरियाच इतक्या हजार चौरस मीटरचा
81 Aureate या निवासी टॉवरमध्ये पृथ्वी शॉ ने आठव्या मजल्यावर फ्लॅट विकत घेतला आहे. वांद्रे रेक्लेमेशन येथे ही इमारत आहे. वांद्रयात बॉलिवूड सेलिब्रिटी, गर्भश्रीमंत लोक रहातात. पृथ्वीच्या अपार्टमेन्टचा 2209 चौरस मीटरचा कार्पेट एरिया आहे. 1654 चौरस मीटरमध्ये गच्ची आहे. त्याशिवाय कार पार्किंगचे तीन स्लॉट आहे, इकोनॉमिक टाइम्सने हे वृत्त दिलं आहे.
स्टॅम्प ड्युटीपोटी भरले इतके लाख
ही घर खरेदी करताना पृथ्वीने स्टॅम्प ड्युटीचे 52.50 लाख रुपये भरले आहेत. काही दिवसांपूर्वीच 28 एप्रिलला ही प्रॉपर्टी रजिस्टर करण्यात आली आहे. पिरॅमिड डेव्हपर्स अँड अल्ट्रा लाइफस्पेसने ही इमारत बांधली आहे.
पहिल्यांदा दिल्लीने किती कोटीला विकत घेतलं?
मुंबईत शालेत स्तरावरील क्रिकेट स्पर्धेपासूनच पृथ्वी शॉ चं नाव चर्चेत आहे. पण 2018 साली त्याला खरी ओळख मिळाली. त्यावेळी पृथ्वीच्या नेतृत्वाखाली भारताने अंडर-19 चा वर्ल्ड कप जिंकला. शॉ ला त्यावेळी दिल्ली कॅपिटल्सने लगेच 1.2 कोटी रुपयांना विकत घेतल होतं. आता तो त्या टीमचा मुख्य खेळाडू आहे.
रिटेन करण्यासाठी दिल्लीने इतके कोटी मोजले
या सीजनमध्ये ऋषभ पंतच्या दिल्ली कॅपिटल्सने त्याला 7.50 कोटी रुपयांमध्ये रिटेन केलं. मागच्या पाचवर्षात पृथ्वीने दिल्लीकडून 12.30 कोटी रुपये कमावले. त्यातील कमाईचा बहुतांश भाग त्याने आलिशान प्रॉपर्टी विकत घेण्यासाठी खर्च केलाय.