IPL 2022 सुरू होण्याआधी हार्दिक पंड्याचा नवा अवतार, बनला ‘बॉम्ब एक्सपर्ट’, इतर संघांना इशारा
भारतात खेळाचा सर्वात मोठा उत्सव मानला जाणारी इंडियन प्रीमियर लीग 2022 (IPL 2022) ही स्पर्धा लवकरच सुरू होणार आहे. या क्रिकेट लीगची जगभरातले क्रिकेटप्रेमी आतुरतेने वाट पाहतात. 26 मार्चपासून सुरू होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) बाबत प्रेक्षकांमध्ये आधीपासूनच मोठी क्रेझ आहे.
मुंबई : भारतात खेळाचा सर्वात मोठा उत्सव मानला जाणारी इंडियन प्रीमियर लीग 2022 (IPL 2022) ही स्पर्धा लवकरच सुरू होणार आहे. या क्रिकेट लीगची जगभरातले क्रिकेटप्रेमी आतुरतेने वाट पाहतात. 26 मार्चपासून सुरू होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) बाबत प्रेक्षकांमध्ये आधीपासूनच मोठी क्रेझ आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना 29 मे रोजी खेळवला जाणार आहे. या टूर्नामेंटमध्ये (IPL Tournament) अनेक प्रकारचे बदल पहायला मिळतील. जसे की, यंदाच्या आईपीएलमध्ये दोन नव्या टीम्स खेळताना दिसतील. यादरम्यान आईपीएल 2022 चा एक नवा प्रोमो व्हीडियो आता समोर आला आहे. यात हार्दिक पंड्या एका नव्या अवतारात दिसतो आहे. माइक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म कू अॅपवर हा व्हिडीओ काही वेळातच व्हायरल होऊ लागला असून या सोशल मीडिया मंचावर ट्रेंड करू लागला.
या व्हिडीओयोमध्ये हार्दिक पांड्याला एका ‘बॉम्ब एक्सपर्ट’च्या रुपात दाखवले आहे. हार्दिक यात बॉम्ब डिफ्यूज टीमला एक गुरुमंत्र देताना दिसतो. “नए को कभी कम मत समझना। नया जब भी कटेगा, 100 टका फटेगा।” हा तो मंत्र. यानंतर त्याच्या टीमचे सदस्य म्हणतात, ‘सही बोला सर।’
खरेतर, हा व्हिडीओ आयपीएलच्या प्रोमोचा आहे, ज्यात दोन नव्या टीम्स सहभागी झाल्यानंतर आता 10 टीम्स झाल्या आहेत. या दोन नव्या टीम्स जोडल्या गेल्याने आईपीएलच्या नव्या सीझनमध्ये काय धमाका होणार आहे, याची हिंट पंड्या त्याच्या व्हिडीओमधून देत आहे.
कू अॅपवर एक्सक्लूसिव रूपात समोर आलेल्या या व्हीडियोत मुख्य गोष्ट ही सांगितली गेली आहे, की या स्पर्धेत आता आठऐवजी 10 टीम्स असणार आहेत. त्यामुळे जुन्या आठ संघांनी नव्या दोन संघांना नवीन आहेत म्हणून कमजोर समजू नये. आता हा खेळ अजूनच रोमांचक होत जाणार आहे.
इतर बातम्या