IPL 2022, Orange Cap : Mumbai Indiansच्या खेळाडूकडे असलेल्या ऑरेंज कॅपला धोका, दीपक हुडा आणि केएल राहुलचा शर्यतीत समावेश
दरवर्षी आयपीएल स्पर्धा सुरु झाल्यानंतर ऑरेंज आणि पर्पल कॅपकडे क्रिकेट रसिकांचं लक्ष असतं. काल लखनौ आणि हैदराबादमध्ये आपीएल 2022चा 12 वा सामना झाला. यानंतर पर्पल आणि ऑरेंज कॅपच्या यादीत पुन्हा एकदा बदल झाले आहेत.
मुंबई: लखनौ सुपर जायंट्सने (Lucknow Super giants) इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत सोमवारी सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. नेरुळच्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर काल आपीएल 2022 मधील हा 12 वा सामना होता. या अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या थरारक सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने सनरायजर्स हैदराबादवर 12 धावांनी विजय मिळवला. लखनौचा संघ आयपीएलमध्ये आतापर्यंत तीन सामने खेळला असून त्यांनी दोन विजय मिळवले आहेत. पहिल्या सामन्यात त्यांना गुजरात टायटन्सकडून (Gujarat Titans) पराभव स्वीकारावा लागला होता. दुसऱ्या लढतीत त्यांनी चेन्नई सुपर किंग्सचे (CSK) 211 धावांचे डोंगराऐवढे लक्ष्य पार केलं. काल झालेल्या तिसऱ्या सामन्यात त्यांनी 169 धावांचा यशस्वी बचाव केला. लखनौच्या विजयात गोलंदाजांनी महत्त्वाची भूमिका बजावली. गोलंदाजांनी अखेरच्या क्षणी कामगिरी उंचावली. लखनौने विजयासाठी 170 धावाचे लक्ष्य दिले होते. SRH ने निर्धारीत 20 षटकात नऊ बाद 157 धावा केल्या. काल लखनौ आणि हैदराबादमध्ये आपीएल 2022चा 12 वा सामना झाला. यानंतर पर्पल आणि ऑरेंज कॅपच्या यादीत पुन्हा एकदा बदल झाले आहेत.
ऑरेंज कॅपच्या शर्यतीत कोण?
सोमवारी लखनौ आणि हैदराबादमध्ये आयपीएलचा बारावा सामना झाला. या सामन्यानंतर पुन्हा एकदा ऑरेंज कॅपच्या यादीत दोन खेळाडू नव्याने आले आहेत. रविवारी पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यात चेन्नईने पराभवाची हॅट्ट्रिक केली होती. रविवारच्या सामन्यानंतर पंजाबकडून लिविंगस्टनने 60 धावा काढल्या तर चेन्नईकडून शिवम दुबे याने 57 धावांची खेळी खेळली करून ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आपलं स्थान पक्क केलं होतं. मात्र, सोमवारी यात पुन्हा बदल झालाय. पहिल्या स्थानी इशान कायम असू त्याने 135 धावा काढल्या आहेत. त्यानंतर जोस बटलर असून त्याच्याही 135 धावा आहेत. लखनौचा दीपक हुडा तिसऱ्या क्रमांकावर आला असून त्याने 119 धावा केल्या आहेत. शिवम दुबे याने 109 धाव केल्याने तो चौथ्या तर केएल राहुल याने 108 धावा केल्याने तो पाचव्या स्थानी आहे.
ऑरेंज कॅपच्या शर्यतीतील टॉप पाच फलंदाज
फलंदाज | धावा |
---|---|
जोस बटलर | 718 |
केएल राहुल | 537 |
डी कॉक | 502 |
शिखर धवन | 460 |
हार्दिक पांड्या | 453 |
पर्पल कॅपचा मानकरी कोण?
फलंदाजीप्रमाणे गोलंदाजीमध्ये सर्वाधिक विकेट काढणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅप दिली जाते. पर्पल कॅपच्या शर्यतीत कोलकाता नाईट रायडर्सचा उमे्श यादव पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर हैदराबाद विरुद्ध चार विकेट घेतल्याने आवेशनं घेतलेल्या विकेटची संख्या सात झाली असून तो पर्पल कॅपच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर तिसऱ्या स्थानावर पंजाब किंग्सचा राहुल चहर असून त्याने सहा विकेट घेतल्या आहेत. चौथ्या स्थानी राजस्थान रॉयल्सचा युझवेंद्र चहल आणि पाचव्या स्थानी गुजरात टायटंसचा मोहम्मद शमी असून दोघांच्याही नावावर पाच विकेट घेतल्याची नोंद आहे.
पर्पल कॅपच्या शर्यतीतील टॉप पाच गोलंदाज
गोलंदाज | विकेट | दिलेल्या धावा |
---|---|---|
युझवेंद्र चहल | 26 | 462 |
वानिंदू हसरंगा | 24 | 362 |
कागिसो रबाडा | 23 | 406 |
उमरान मलिक | 22 | 444 |
कुलदीप यादव | 21 | 419 |
ऑरेंज आणि पर्पल कॅप म्हणजे काय?
दरवर्षी आयपीएल स्पर्धा सुरु झाल्यानंतर ऑरेंज आणि पर्पल कॅपकडे क्रिकेट रसिकांचं लक्ष असतं. कारण आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला ऑरेंज कॅप दिली जाते, तर सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅपने सन्मानित केलं जातं. स्पर्धा सुरु असताना ऑरेंज आणि पर्पल कॅपचे मानकरी सतत बदलत असतात.
इतर बातम्या
IPL 2022 RR vs RCB Live Streaming: जाणून घ्या राजस्थान विरुद्ध बँगलोर सामना कधी आणि कुठे पाहता येईल?
Farmer Death | ऊसाच्या शेतातील आग विझवण्याचा प्रयत्न, शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू
Chanakya Niti | आयुष्यात आनंदी राहायचंय? तर या लोकांपासून चार हात लांबच राहा