IPL 2022: देशापेक्षा पैसा प्रिय, दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटपटूंनी दाखवून दिलं

IPL 2022: इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेला (IPL) आता फक्त काही दिवसांचा अवधी उरला आहे. येत्या 26 फेब्रुवारीपासून आयपीएलच्या 15 व्या सीजनचं बिगुल वाजणार आहे.

IPL 2022: देशापेक्षा पैसा प्रिय, दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटपटूंनी दाखवून दिलं
Kagiso Rabada - Lungi NgidiImage Credit source: File photo
Follow us
| Updated on: Mar 18, 2022 | 3:40 PM

IPL 2022: इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेला (IPL) आता फक्त काही दिवसांचा अवधी उरला आहे. येत्या 26 फेब्रुवारीपासून आयपीएलच्या 15 व्या सीजनचं बिगुल वाजणार आहे. आयपीएल स्पर्धा सुरु होत असतानाच, दक्षिण आफ्रिकेचा बांग्लादेश (South Africa Bangladesh Tour) दौराही आहे. त्यामुळे विविध फ्रेंचायजींनी विकत घेतलेले दक्षिण आफ्रिकेचे प्रमुख खेळाडू आयपीएलमध्ये खेळणार का? असा प्रश्न निर्माण झाला होता. देश की, IPL दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू काय निवडणार? असा प्रश्न चर्चिला जात होता. अखेर त्याचं उत्तर मिळालं आहे. टेस्ट डयुटी आणि आयपीएल यामध्ये खेळाडू काय निवडतात? त्यातून त्यांची निष्ठा दिसून येईल, असं दक्षिण आफ्रिकेचा कसोटी कर्णधार डीन एल्गर (Dean Elgar) म्हणाला होता. न्यूझीलंड दौऱ्यावरुन मायदेशात दाखल झाल्यानंतर एल्गरचे हे उदगार होते.

खेळाडूंनी दिलं उत्तर

दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटपटूंनी या प्रश्नाचं उत्तर देतानाच त्यांची निष्ठा कुठे आहे, ते स्पष्ट केलं आहे. कागिसो रबाडा, लुंगी निगिडी, मार्को जॅनसेन, रॅसी वॅन डेर डुसे आणि एडन मार्कराम बांग्लादेश मालिकेऐवजी आयपीएलमध्ये खेळणार आहेत. “या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी काहीतरी करावं लागेल. परिस्थिती दुर्देवी असून फार काही करु शकत नाही” असं क्रिकेट साऊथ आफ्रिकेचे अधिकारी व्हिक्टर पीटसँग म्हणाले. इनसाइड स्पोर्ट्सने हे वृत्त दिलं आहे.

एल्गर समोर चॅलेंज

कागिसो रबाडा, लुंगी निगिडी आणि मार्को जॅनसेन यांच्या अनुपस्थितीत बांग्लादेश विरुद्धची मालिका डीन एल्गरसाठी आव्हानात्मक असेल. कारण त्याला प्रमुख गोलंदाजांशिवाय खेळावं लागणार आहे. दक्षिण आफ्रिका बांग्लादेश विरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका आहे.

कोण आयपीएलमध्ये पहिल्यांदा खेळतोय

कागिसो रबाडा, लुंगी निगिडी आणि मार्को जॅनसेन हे दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाजीचे आधारस्तंभ आहे. भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत या तिन्ही गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी केली आहे. त्यांची कमतरता भरुन काढणं सोप नाहीय. मार्च महिन्याच्या अखेरीस बांग्लादेश विरुद्धची मालिका सुरु होत आहे. त्याचवेळी आयपीएल सुद्धा आहे. रॅसी वॅन डेर डुसे पहिल्यांदाच आयपीएलमध्ये खेळतोय. एडन मार्करामने सुद्धा आयपीएलला प्राधान्य दिलं आहे.

खेळाडूंना रोखता येणार नाही

राष्ट्रीय कर्तव्यापेक्षा आयपीएलची निवड करणाऱ्या खेळाडूंना रोखता येणार नाही. संघटनेचे हात बांधलेले आहेत, असे क्रिकेट दक्षिण आफ्रिकेचे नवीन सीईओ फोलेत्सी मोसीकी यांनी सांगितलं. एमओयू हा खेळाडूंच्या बाजूने असल्याचं त्यांनी सांगितलं. एमओयू नुसार आयपीएल या एकमेव टी 20 लीग स्पर्धेला SACA कडून मान्यता आहे. त्यामुळे खेळाडूंना रोखता येणार नाही. दक्षिण आफ्रिकेच्या विविध खेळाडूंना आयपीएल फ्रेंचायजींनी कोट्यवधी रुपये मोजून विकत घेतलं आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.