IPL 2022: विराटला नेतृत्वावरुन शिव्या देणारे आता Rohit Sharma बद्दल काय बोलणार? 5 चषक जिंकणाऱ्या कर्णधाराला झालंय काय?

त्याने मातीला स्पर्श केला तर तिचं सोनं होतं. सामन्यादरम्यान त्याचा मेंदू कॉम्प्युटरपेक्षाही वेगाने काम करतो. खेळाडूंकडून चांगली कामगिरी करून घेणे हे त्याचे कौशल्य मानले जाते. रोहित शर्माबद्दल (Rohit Sharma) या काही गोष्टी अनेकदा बोलल्या जात होत्या.

IPL 2022: विराटला नेतृत्वावरुन शिव्या देणारे आता Rohit Sharma बद्दल काय बोलणार? 5 चषक जिंकणाऱ्या कर्णधाराला झालंय काय?
Rohit Sharma Image Credit source: PTI
Follow us
| Updated on: Apr 17, 2022 | 12:44 PM

मुंबई : त्याने मातीला स्पर्श केला तर तिचं सोनं होतं. सामन्यादरम्यान त्याचा मेंदू कॉम्प्युटरपेक्षाही वेगाने काम करतो. खेळाडूंकडून चांगली कामगिरी करून घेणे हे त्याचे कौशल्य मानले जाते. रोहित शर्माबद्दल (Rohit Sharma) या काही गोष्टी अनेकदा बोलल्या जात होत्या. आणि का बोलणार नाहीत? कर्णधार म्हणून त्याने अनेक विक्रम केले आहेत. तो सर्वाधिक पाच वेळा आयपीएल (IPL 2022) स्पर्धा जिंकणारा कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सचा दर्जा गगनाला भिडला होता, त्याच्या नेतृत्वात संघाला यशापेक्षा कमी काहीच दिसले नाही पण आता काळ बदलला आहे, परिस्थिती बदलली आहे आणि रोहित शर्माचे वागणेही बदलले आहे. IPL 2022 मध्ये मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) सारख्या संघाने सलग 6 सामने गमावले आहेत यावर प्रेक्षक विश्वास ठेवू शकत नाहीत. मुंबईने आतापर्यंत एकही सामना जिंकलेला नाही. आता प्रश्न असा आहे की विराट कोहलीला त्याच्या नेतृत्वावरुन शिव्या देणारे लोक रोहित शर्माबद्दल काय म्हणतील?

यंदाच्या मोसमात रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सला पहिल्याच सामन्यात दिल्ली कॅपिटल्सकडून पराभव पत्करावा लागला. त्यानंतर राजस्थान रॉयल्सने त्यांचा खेळ संपवला. कोलकाता नाईट रायडर्सनेही बाजी मारली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्जनेही मुंबईला धुवून काढले आणि शनिवारी लखनौच्या हल्ल्याने रोहितच्या संघाला सहावा पराभव पत्करावा लागला. मुंबई इंडियन्सने पहिल्यांदाच इतकी खराब कामगिरी केली असून आता त्यांचे प्लेऑफमध्ये पोहोचणे जवळपास अशक्य आहे. धोनीनंतर सर्वात सक्षम कर्णधार मानल्या जाणाऱ्या रोहित शर्माने आता अपयशी कर्णधारांच्या एका यादीत स्थान मिळवले असून त्यात विराट कोहली आणि महेला जयवर्धने यांचीही नावे आहेत.

रोहित शर्माची विराटसोबत बरोबरी

मुंबई इंडियन्सने या मोसमात सलग 6 सामने गमावले असून अशी परिस्थिती त्यांनी प्रथमच पाहिली नाही. यापूर्वी 2019 मध्ये, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनेही पहिले 6 सामने गमावले होते आणि 2013 मध्ये महेला जयवर्धनेच्या नेतृत्वाखालील दिल्ली डेअरडेव्हिल्सचे नशीब असेच होते. दिल्ली आणि बंगळुरूचे संघ पहिले 6 सामने गमावल्यानंतर पॉइंट्स टेबलमध्ये शेवटच्या स्थानावर राहिले होते. तर मुंबई इंडियन्सच्या बाबतीतही असेच घडणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

रोहित शर्माच्या नेतृत्वाला काय झालंय?

रोहित शर्माला सर्वोत्कृष्ट कर्णधार म्हणणारे आता त्यांच्या सलग 6 पराभवानंतर काय म्हणतील? रोहितच्या कर्णधारपदाची, त्याच्या नेतृत्वाची जादू कुठे गायब झाली हा प्रश्न आहे. या प्रश्नांचे एकच उत्तर आहे. कोणताही कर्णधार तेव्हाच चांगला वाटतो जेव्हा त्याचा संघ चांगला असतो. गौतम गंभीरने धोनीबद्दल बोलताना असे अनेकदा सांगितले आहे. धोनीला विश्वचषक 2011 च्या विजयाचं श्रेय दिलं जातं. धोनीला 2007 च्या टी-20 विश्वचषक आणि 2013 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीचा हिरो म्हटले जाते, परंतु सत्य हे आहे की जेव्हा त्याने या स्पर्धा जिंकल्या तेव्हा त्याच्याकडे चांगली टीम होती.

आयपीएल 2022 मध्ये रोहित शर्माकडे पूर्वीसारखा सक्षम संघ नाही. त्याच्याकडे ट्रेंट बोल्ट किंवा राहुल चाहरसारखा लेगस्पिनर नाही. फलंदाजी चांगली आहे पण गोलंदाजी खूपच कमकुवत आहे. अशा परिस्थितीत रोहित शर्मा कर्णधार म्हणून कसा यशस्वी होणार?

इतर बातम्या

DC vs RCB IPL Match Result: दिनेश कार्तिकच्या वादळापुढे दिल्ली उद्वस्त, बँगलोरचा चौथा ‘रॉयल’ विजय

DC vs RCB IPL 2022 Dinesh Karthik: ये एज-वेज में विश्वास नही रखता, सगळ्यांची एकच भावना, त्याला T-20 वर्ल्ड कपच्या टीममध्ये घ्याच

DC vs RCB IPL 2022: Virat Kohli चं नशीब खराब, जबरदस्त RUN OUT, पहा VIDEO

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.