RR vs DC IPL 2022: अश्विनची हाफ सेंच्युरी, दिल्लीला विजयासाठी 161 धावांचे टार्गेट
IPL 2022 मध्ये आज दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्समध्ये सामना सुरु आहे. आयपीएलमधला हा 58 वा सामना आहे.
मुंबई: राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) आज प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात सहा बाद 160 धावा केल्या. रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) (50) आणि देवदत्त पडिक्कलच्या (48) फलंदाजीच्या बळावर राजस्थानने हे टार्गेट दिलं आहे. दिल्ली कॅपिटल्सला आजच्या सामन्यात विजय आवश्यक आहे. पृथ्वी शॉ आजच्या सामन्यात खेळत नाहीय. राजस्थानसाठी आज सुरुवात फारशी चांगली झाली नाही. सलामीवीर जोस बटलर (Jos buttler) स्वस्तात बाद झाला. चेतन साकारियाने जोस बटलरला (7) धावांवर शार्दुल ठाकूरकरवी झेलबाद केलं. यशस्वी जैस्वालही खेळपट्टिवर टिकू शकला नाही. तो (19) रन्सवर आऊट झाला. रविचंद्रन अश्विनला आज वरती बढती देण्यात आली. त्याने चांगली फलंदाजी केली. वनडाऊन आलेल्या अश्विनने 38 चेंडूत 50 धावा फटकावल्या. यात चार चौकार आणि दोन षटकार होते. अश्विन अर्धशतकानंतर लगेच बाद झाला. मार्शने त्याला वॉर्नरकरवी झेलबाद केलं. कॅप्टन संजू सॅमसन आज लवकर आऊट झाला. अवघ्या 6 रन्सवर नॉर्खियाने त्याला ठाकूरकरवी झेलबाद केलं.
राजस्थानचा संघ जिंकल्यास काय फायदा?
IPL 2022 मध्ये आज दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्समध्ये सामना सुरु आहे. आयपीएलमधला हा 58 वा सामना आहे. दिल्लीचा कॅप्टन ऋषभ पंतने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. राजस्थान रॉयल्सने 11 सामन्यात सात विजय मिळवले असून त्यांचे 14 पॉइंटस झाले आहेत. पॉइंटस टेबलमध्ये ते तिसऱ्या स्थानावर आहेत.
View this post on Instagram
दिल्लीच्या टीमला आज विजय आवश्यक
आजचा सामना जिंकल्यास, ते लखनौशी बरोबरी करतील. प्लेऑफमध्ये क्वालिफाय करण्याच्या दिशेने एक पाऊल टाकतील. दिल्लीचा संघ हा सामना जिंकल्यास ते टॉप चारच्या बाहेरच राहतील. पण प्लेऑफमध्ये दाखल होण्याचं त्यांचं आव्हान टिकून राहील. त्यामुळे दिल्लीच्या टीमला आज विजय आवश्यक आहे.