आयपीएलचं बिगूल वाजलं! येत्या 26 मार्चपासून सामन्यांना सुरुवात; मुंबईत 55 मॅच

IPL 2022 Schedule : अखेर (IPL 2022) इंडियन प्रीमियर लीग 2022 चं बिगूल वाजलंय. (IPL 2022 Match Date & Time) यंदाच्या आयपीएल सत्राला 26 मार्चपासून सुरुवात होणार आहे. यंदा सर्वाधिक 55 सामने मुंबईत खेवळवले जाणार आहेत.

आयपीएलचं बिगूल वाजलं! येत्या 26 मार्चपासून सामन्यांना सुरुवात; मुंबईत 55 मॅच
Follow us
| Updated on: Feb 25, 2022 | 6:39 AM

IPL 2022 Schedule : अखेर (IPL 2022) इंडियन प्रीमियर लीग 2022 चं बिगूल वाजलंय. (IPL 2022 Match Date & Time) यंदाच्या आयपीएल सत्राला 26 मार्चपासून सुरुवात होणार आहे. गुरुवारी आयपीएल गव्हर्निंग काउंसिलची (IPL Governing Council) बैठक पार पडली. या बैठकीत यंदाच्या सत्रातील आयपीएल मॅचला येत्या 26 मार्चपासून सुरुवात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या वर्षी जगासह भारतावर कोरोनाचे संकट होते. भारतात तर परिस्थिती अधिकच गंभीर बनली होती. त्यामुळे आयपीएलचे सामने भारताबाहेर झाले होते. मात्र यंदा सर्व सामने भारतातच होणार असून, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व काळजी घेऊन सामने आयोजित करण्यात येणार आहेत. यंदाच्या आयपीएलचे बुहुता:श सामने हे पुणे आणि मुंबईतच खेळवले जाणार आहेत. मुंबईत 55 तर पुण्यात 15 मॅच खेळवण्यात येणार आहेत.

मुंबई आणि पुण्यात सामन्यांचे आयोजन

यंदा आयपीएलचे 55 सामने हे मुंबईत तर 15 सामने पुण्यात खेळवण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. या सामन्यांपैकी 20 सामने हे मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर, 20 सामने डीवाय पाटील स्टेडियमवर तर सीसीआयमध्ये 15 सामने होणार आहेत. तर पुण्यात 15 सामने खेळवण्यात येणार असल्याची माहिती आयपीएल गव्हर्निंग काउंसीलच्या वतीने देण्यात आली आहे. आयपीएलच्या नियोजनासाठी आज पुन्हा एकदा आयपीएल गव्हर्निंग काउंसीलची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार असल्याची माहिती समोर येत आहे. यंदा अहमदाबाद आणि लखनऊ असे दोन नवीन संघ पहिल्यांदाच आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहेत. दरम्यान यंदाच्या आयपीएल सत्रात प्रेक्षकांना मैदानात जाऊन मॅच पाहाण्याची संधी मिळणार असल्याची चर्चा आहे. मात्र त्यासाठी महाराष्ट्र सरकारने ठरवून दिलेल्या कोरोनाविषयक सर्व नियमांचे पालन करणे आवश्यक असणार आहे.

आयपीएलमध्ये सहभागी संघ

1. दिल्ली कॅपिटल्स 2. चेन्नई सुपर किंग्ज 3. मुंबई इंडियन्स 4. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर 5. कोलकाता नाईट रायडर्स 6. पंजाब किंग्ज 7. गुजरात टायटन्स 8. लखनऊ सुपर जायंट्स 9. सनरायझर्स हैदराबाद 10. राजस्थान रॉयल्स

संबंधित बातम्या

IND vs SL: इशान-श्रेयसचा तडाखा, पहिल्या T 20 मध्ये भारताचा श्रीलंकेवर दणदणीत विजय

IND vs SL: रोहित शर्मा T 20 चा नवीन किंग, विराटसोबत मोठ-मोठ्या धुरंधरांना टाकलं मागे, रचना नवीन रेकॉर्ड

INDvsSL Ishan kishan: ‘पैसा वसूल भाईसाहब’ इशानच्या धमाकेदार फलंदाजीनंतर नेटीझन्सच्या भन्नाट Reaction

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.