PBKS vs RCB : आता कर्णधार नाही, तर फलंदाज! नवं पर्व, नवं लक्ष्य..! IPL 2022मध्ये काय चमत्कार करणार Virat Kohli?

विराट कोहली (Virat Kohli) 9 सीझननंतर प्रथमच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाच्या प्लेइंग इलेव्हनचा एक फलंदाज म्हणून भाग घेणार आहे. कर्णधारपदाशिवायही आरसीबीसाठी अनेक मार्गांनी नेतृत्व करू शकतो, असा विश्वास कोहलीचा आहे.

PBKS vs RCB : आता कर्णधार नाही, तर फलंदाज! नवं पर्व, नवं लक्ष्य..! IPL 2022मध्ये काय चमत्कार करणार Virat Kohli?
विराट कोहलीImage Credit source: Tv9
Follow us
| Updated on: Mar 27, 2022 | 9:05 AM

आयपीएल 2022चा (IPL 2022) पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात CSK मोठा बदल करून मैदानात उतरला. हा बदल संघाच्या कर्णधारपदाचा होता. सलग 12 हंगाम सीएसकेची कमान सांभाळल्यानंतर, एमएस धोनी (MS Dhoni) केवळ एक खेळाडू म्हणून संघाचा भाग बनला. रविवार 27 मार्च रोजी सीझनच्या तिसर्‍या सामन्यात असेच चित्र दिसेल, जेव्हा विराट कोहली (Virat Kohli) 9 सीझननंतर प्रथमच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाच्या प्लेइंग इलेव्हनचा एक फलंदाज म्हणून भाग घेणार आहे. कर्णधारपद सोडल्यानंतरही धोनी ज्याप्रमाणे संघाच्या नेतृत्वाचा महत्त्वाचा भाग आहे, त्याचप्रमाणे तो कर्णधारपदाशिवायही आरसीबीसाठी अनेक मार्गांनी नेतृत्व करू शकतो, असा विश्वास कोहलीचा आहे. त्याचबरोबर कोहलीने सांगितले, की त्याला फलंदाज म्हणूनही सुधारणा करायची आहे.

‘योगदान देताना अभिमानच’

गेल्या वर्षी यूएईमध्ये खेळल्या गेलेल्या आयपीएल 2022 हंगामाच्या दुसऱ्या सहामाहीनंतर कोहलीने कर्णधारपद सोडले होते. आता फॅफ डू प्लेसिसकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवल्यानंतर कोहली 2012नंतर प्रथमच कर्णधारपदाच्या ओझ्यातून मुक्त होणार आहे. मात्र, असे असले तरी कोहली संघाचा प्रमुख म्हणून महत्त्वाचा सदस्य. कोहलीने आरसीबीच्या वेबसाइटला सांगितले, की तुम्ही संघात एक नेतृत्व देणारे होऊ शकता. तुम्ही संघाला यशापर्यंत नेऊ शकता आणि ट्रॉफी आणि विजेतेपदे जिंकून देऊ शकता. संघासाठी योगदान देताना मला अभिमानच वाटेल.

डिव्हिलियर्स गेला, फॅफ डू प्लेसिस आला

दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी एबी डिव्हिलियर्स आरसीबीमधून बाहेर पडला, तर आता दक्षिण आफ्रिकेचा आणखी एक अनुभवी फॅफ डू प्लेसिस आला आहे. डू प्लेसिसला तो येताच पदभार स्वीकारण्याची संधी मिळाली असून कोहली याबद्दल खूप उत्सुक आहे. संघातील या बदलाबाबत माजी कर्णधार म्हणाला, ‘बर्‍याच जणांना संघाबाहेर पडल्यानंतर बदलाची जाणिव होते. मी मात्र भाग्यवान आहे, की संघात असून हे सर्व माझ्या डोळ्यांसमोर होईल.”

2022मध्ये दिसेल 2016चा फॉर्म?

2016च्या मोसमात कोहलीच्या बॅटने अनेक रेकॉर्ड तोडले होते. त्यानंतर आरसीबीच्या तत्कालीन कर्णधाराने 16 सामन्यात 4 शतकांच्या मदतीने 973 धावा केल्या होत्या, जो आजही एक विक्रम आहे. त्या मोसमात आरसीबीने अंतिम फेरी गाठली होती, पण विजेतेपदाच्या सामन्यात त्यांचा पराभव झाला होता. आता कर्णधारपदाचा भार कमी झाल्यानंतर कोहली मोकळेपणाने खेळेल आणि नंतर जुन्या शैलीत फलंदाजी करेल, अशी अपेक्षा आहे. पंजाब किंग्ज विरुद्ध आरसीबीचा पहिला सामना नवी मुंबईत आज (27 मार्च)ला होणार आहे.

आणखी वाचा :

DC vs MI : बेबी डिव्हिलियर्स-टीम डेव्हिडवर सर्वांच्या नजरा, अशी असेल दिल्लीविरुद्ध Mumbai Indians ची Playing XI

CSK vs KKR, IPL 2022: उथाप्पाचा पाय क्रीझ बाहेर जाताच, शेल्डन जॅक्सनने खेळ संपवला, पहा दर्जेदार स्टम्पिंग VIDEO

IPL 2022 DC vs MI: ‘कॅप्टन म्हणून ऋषभमध्येही रोहित सारखेच…’, कोच रिकी पाँटिंग म्हणाले….

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.