IPL 2022: RCB अजूनही कॅप्टनशिपच्या गोंधळात, विराट कोहली की, दिनेश कार्तिक कोण होणार कर्णधार?
IPL 2022 स्पर्धा सुरु व्हायला आता महिन्याभरापेक्षा कमी कालावधी उरला आहे. सर्व 10 टीम्सना त्यांचे प्लेयर्स मिळाले आहेत. 26 मार्चपासून स्पर्धेची सुरुवात होईल.
बंगळुरु: IPL 2022 स्पर्धा सुरु व्हायला आता महिन्याभरापेक्षा कमी कालावधी उरला आहे. सर्व 10 टीम्सना त्यांचे प्लेयर्स मिळाले आहेत. 26 मार्चपासून स्पर्धेची सुरुवात होईल. पण या दहा संघांमध्ये एक संघ असाही आहे, ज्याचा कर्णधार कोण होणार? हे अद्यापही माहित नाहीय. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने (Royal Challengers Bangalore)अद्यापही कर्णधाराची निवड केलेली नाहीय. आयपीएल 2021 नंतर विराट कोहलीने (Virat Kohli) कॅप्टनशिप सोडली. आयपीएल 2022 च्या ऑक्शननंतर नव्या कॅप्टनची निवड होणार ही अजूनही चर्चाच आहे. कोलकाता, पंजाब किंग्स या संघांनी आपल्या कर्णधारांची नाव जाहीर केली आहे. श्रेयस अय्यर कोलकात्याचा कर्णधार बनलाय तर मयंक अग्रवाल पंजाबचं नेतृत्व करणार आहे. आरसीबीच्या कर्णधारपदाचा प्रश्न अजूनही अधांतरीच आहे.
कॅप्टनशिपसाठी या नावांची चर्चा
आरसीबीने ऑक्शनआधी विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल आणि मोहम्मद सिराज या खेळाडूंना रिटेन केलं होतं. ऑक्शनमध्ये RCB ने दिनेश कार्तिक, फाफ डू प्लेसी सारख्या सिनियर खेळाडूंना विकत घेतलय. मॅक्सवेल, कार्तिक आणि डु प्लेसी हे कर्णधारपदाचे दावेदार आहेत. मॅक्सवेल आणि डु प्लेसी परदेशी खेळाडू आहेत, त्या दोघांपैकी कोणी कर्णधार बनलं, तर संघाच्या कॉम्बिनेशनवर परिणाम होईल. त्यामुळे दिनेश कार्तिक कर्णधारपदासाठी प्रबळ दावेदार आहे. त्याच्याकडे केकेआरचं कर्णधारपद भूषवण्याचा अनुभव आहे. आरसीबीसाठीही कार्तिक आधी खेळला आहे.
कार्तिकच्या नेतृत्वाखाली टीम पोहोचली प्लेऑफमध्ये
कार्तिकच्या नेतृत्वाखाली केकेआरचा संघ 2018 मध्ये प्लेऑफमध्ये पोहोचला होता. तामिळनाडूचा रणजी संघही कार्तिकच्या नेतृत्वाखाली यशस्वी ठरला आहे. त्या दृष्टीने दिनेश कार्तिक आरसीबीचा कॅप्टन बनू शकतो. डु प्लेसी सुद्धा मजबूत दावेदार आहे. क्रिकेट खेळणाऱ्या देशांमध्ये वेगवेगळ्या लीग स्पर्धेत त्याने नेतृत्व केलं आहे. दक्षिण आफ्रिकेच नेतृत्वही त्याने केलं आहे.
कोहली पुन्हा कर्णधार बनणार?
विराट कोहलीलाही कर्णधार बनवलं जाण्याची एक शक्यता आहे. आरसीबी मॅनेजमेंट कोहलीला कॅप्टनशिप स्वीकारण्याची विनंती करेल, असही मध्यंतरी म्हटलं जात होतं. कोहली कर्णधार बनण्याची शक्यता खूपच कमी आहे. कारण त्याने आधीच तिन्ही फॉर्मेटचं कर्णधारपद सोडलं आहे.
IPL 2022 Who will be rcb next captain dinesh kartik & virat kohli names in discussion