WTC Final 2023 आधी या टीमला मोठा झटका, स्टार खेळाडू दुखापतीमुळे ‘आऊट’
आपल्या मॅचविनर खेळाडूला मोठ्या स्पर्धेआधी दुखापत होऊ नये याची काळजी क्रिकेट बोर्डाकडून घेतली जाते. यासाठी वर्कलोड कमिटी लक्ष ठेवून असते. मात्र दुखापत कधीही होऊ शकते.
मुंबई | आयपीएल 16 वा मोसम संपल्यानंतर प्रत्येक देशाचे खेळाडू मायदेशी रवाना झाले आहेत. आता आयपीएलनंतर आंतरराष्ट्रीय मालिकांची रंगत पुन्हा एकदा रंगणार आहे. टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात लंडनमध्ये द ओव्हल मैदानात 7 ते 11 जून दरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल खेळवण्यात येणार आहे. या महामुकाबल्यासाठी दोन्ही संघ सज्ज आहेत. तर दुसऱ्या बाजूला श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे.
श्रीलंका आणि अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने या एकदिवसीय मालिकेसाठी आपआपले संघ जाहीर केले आहेत. मात्र त्याआधी अफगाणिस्तानला मजबूत झटका लागला आहे. आयपीएलमध्ये दिग्गज फलंदाजांना फिरकीच्या जाळ्यात अडकवणारा राशिद खान हा स्वत: दुखापतीत अडकला आहे. राशिदला पाठीच्या खालच्या भागात त्रास जाणवतोय. यामुळे राशिदला या एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडावं लागलंय.
राशिदवर वैद्यकीय पथक लक्ष ठेवून आहेत. राशिद श्रीलंका विरुद्धच्या तिसऱ्या वनडेत खेळेल, अशी आशा अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाकडून व्यक्त करण्यात आली आहे. आता राशिदच्या अनुपस्थितीत मोहम्मद नबी, मुजबी उर रहमान आणि नूर अहमद यांच्या खांद्यावर अतिरिक्त जबाबदारी असणार आहे. उभयसंघातील या मालिकेला शुक्रवार 2 जूनपासून सुरुवात होणार आहे. हे तिन्ही सामने एकाच मैदानात खेळवण्यात येणार आहेत.
एकदिवसीय मालिका वेळापत्रक
शुक्रवार 2 जून , पहिली वनडे, सकाळी 10 वाजता.
रविवार 4 जून, दुसरी वनडे, सकाळी 10 वाजता.
बुधवार 7 जून, तिसरी वनडे, सकाळी 10 वाजता.
अफगाणिस्तान विरुद्धच्या वनडे सीरिजसाठी टीम श्रीलंका | दासून शनाका (कर्णधार), कुसल मेंडिस (विकेटकीपर), पथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, अँजेलो मॅथ्यूज, धनंजया डी सिल्वा, चारिथ असालंका, सदीरा समरविक्रमा, चमिका करुणारत्ने, दुशान हेमंथा, वानिंदु हसरंगा, लहिरु कुमारा दुष्मंथा चमिरा, कसून राजिथा, मथिशा पथिराना आणि महीष तीक्षणा
श्रीलंका विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी अफगाणिस्तान टीम | हशमतुल्लाह शाहिदी (कप्तान), रहमत शाह, रहमानुल्लाह गुरबाज, इब्राहिम जादरान, रियाज हसन, नजीबुल्लाह जादरान, मोहम्मद नबी, इकराम अलीखेल, अजमतुल्लाह ओमारजई, राशिद खान, मुजीब उर रहमान, नूर अहमद, अब्दुल रहमान, फजलहक फारुकी आणि फरीद अहमद मलिक.