M S Dhoni चा CSK टीममधील विश्वासू सहकारी अमेरिकेत ‘या’ टीमकडून खेळणार
अमेरिकेत टी20 मेजर लीग क्रिकेट टुर्नामेंट सुरु होतेय. धोनीचा हा सहकारी चेन्नई सुपर किंग्सचा कणा होता. चेन्नई टीममधील बरेच खेळाडू अमेरिकेतील T20 लीगमध्ये खेळताना दिसतील.
नवी दिल्ली : मागच्या महिन्यात IPL 2023 चा सीजन संपला. यंदा चेन्नई सुपर किंग्सने विजेतेपद मिळवलं. त्यांनी फायनलमध्ये हार्दिक पांड्याच्या गुजरात टायटन्सचा पराभव केला. चेन्नई सुपर किंग्सच आयपीएल टुर्नामेंटमधील हे पाचव विजेतेपद आहे. त्यांनी मुंबई इंडियन्सच्या आयपीएलमधील पाच विजेतेपदांची बरोबरी केली आहे. CSK च्या जेतेपदामध्ये एमएस धोनीच महत्वाच योगदान होतच. पण त्याचबरोबर टीममधील सर्व सहकाऱ्यांनी आपआपली भूमिका चोख बजावली.
मागची काही वर्ष चेन्नई सुपर किंग्ससाठी सातत्यपूर्ण प्रदर्शन करणारा एक खेळाडू आता लवकरच आपल्याला अमेरिकेत खेळताना दिसणार आहे.
हा खेळाडू चेन्नई टीमचा कणा
अमेरिकेत टी20 मेजर लीग क्रिकेट टुर्नामेंट सुरु होतेय. त्या लीगमध्ये CSK टीममधील धोनीचा हा सहकारी खेळताना दिसेल. यंदाच्या सीजनमध्ये CSK कडून खेळताना त्याला विशेष प्रभावी कामगिरी करता आली नाही. पण मागची काही वर्ष हा प्लेयर चेन्नई टीमचा कणा राहिला आहे.
क्रिकेटपासून लांब जाणार नाही
अमेरिकेत T20 लीगमध्ये खेळणाऱ्या CSK च्या या प्लेयरच नाव आहे, अंबाती रायडू. CSK ने यंदाच्या सीजनमध्ये विजेतेपदाची ट्रॉफी उंचावल्यानंतर रायडूने निवृत्तीची घोषणा केली. अंबाती रायडू निवृत्त झाला असला, तरी तो क्रिकेटपासून लांब जाणार नाहीय. क्रिकेटच्या मैदानावर पुन्हा एकदा त्याची बॅट तळपताना दिसेल.
पहिल्या सीजनमध्ये किती टीम्स?
रायडू अमेरिकेतील या लीगमध्ये चेन्नई सुपर किंग्सची फ्रेंचायजी टीम टेक्सास सुपर किंग्ससाठी खेळणार आहे. टेक्सास सुपर किंग्सने सोशल मीडियावर याबाबत घोषणा केली आहे. भारतीय टीमच प्रतिनिधीत्व केलेला मेजर लीगमध्ये खेळणारा अंबाती रायडू पहिला क्रिकेटपटू ठरणार आहे. या लीगच्या पहिल्या सीजनमध्ये एकूण सहा टीम्स खेळताना दिसतील. 13 ते 31 जुलै दरम्यान पहिला सीजन होणार आहे. चेन्नईच सुपर किंग्सचे कुठले प्लेयर अमेरिकेत खेळणार?
रायडूशिवाय चेन्नई सुपर किंग्सचे आणखी काही खेळाडू टेक्सास सुपर किंग्सकडून खेळताना दिसतील. यात न्यूझीलंडचा डेवॉन कॉनवे सुद्धा आहे. याच देशाचा मिचेल सँटनर सुद्धा टेक्सास टीमकडून खेळणार आहे. चेन्नई सुपर किंग्सचा गोलंदाजी कोच ड्वेन ब्रावो सुद्धा खेळणार आहे. डेविड मिलर टेक्सासकडून खेळेल. एमएलसीमध्ये ते आपला पहिला सामना लॉस एंजेल्स नाइट रायडर्स विरुद्ध खेळणार आहेत. चेन्नई आणि कोलकाताशिवाय आयपीएलमधील मुंबई आणि दिल्ली फ्रेंचायजीने सुद्धा टीम विकत घेतल्या आहेत.