MI vs CSK 2023 : 6,4,4,4,4, Ajinkya Rahane ने एका ओव्हरमध्ये मॅचची कशी दिशा बदलली, ते पहा VIDEO

MI vs CSK 2023 : Ajinkya Rahane चं तुफान, मुंबई इंडियन्स उद्धवस्त. मुंबईच्याच मुलाने मुंबई इंडियन्स विरुद्ध जबरदस्त बॅटिंग केली. अजिंक्य रहाणेने संपूर्ण सामन्याचीच दिशा बदलून टाकली. त्याने चेन्नई सुपर किंग्सला जोरदार सुरुवात दिली.

MI vs CSK 2023 : 6,4,4,4,4, Ajinkya Rahane ने एका ओव्हरमध्ये मॅचची कशी दिशा बदलली, ते पहा VIDEO
Ajinkya rahaneImage Credit source: AFP
Follow us
| Updated on: Apr 09, 2023 | 7:52 AM

MI vs CSK IPL 2023 : चेन्नई सुपर किंग्सने काल मुंबई इंडियन्सवर मोठा विजय मिळवला. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात मुंबईचाच मुलगा अजिंक्य रहाणे हिरो ठरला. त्याच्या वादळी बॅटिंगने मॅचची दिशाच बदलून टाकली. चेन्नईने मुंबई इंडियन्सवर 7 विकेट राखून विजय मिळवला. रहाणेने मुंबई विरुद्ध 19 चेंडूत अर्धशतक झळकवलं. आयपीएल 2020 नंतर अजिंक्य रहाणेची लीगमधील ही पहिली फिफ्टी आहे.

चेन्नई सुपर किंग्सकडून डेब्यु करताना त्याने मुंबईच्या बॉलर्सची जोरदार धुलाई केली. त्याने आपल्या तुफानी इनिंगमध्ये एका ओव्हरमध्ये 5 चौकार मारले.

याआधी CSK कडून कोणी अर्धशतक झळकवलय?

अजिंक्य रहाणेच आयपीएल इतिहासातील हे वेगवान अर्धशतक आहे. त्याच्याआधी चेन्नईकडून खेळताना सुरेश रैनाने 2014 साली 16 चेंडूत अर्धशतक झळकवल होतं. मोइन अलीने सुद्धा 19 चेंडूत अर्धशतकी खेळी साकारली होती.

4 बॉल 4 फोर

अजिंक्य रहाणेने मुंबईचा गोलंदाज अर्शद खानला जाम धुतलं. त्याच्या बॉलिंगवर खोऱ्याने धावा वसूल केल्या. अर्शदच्या एका ओव्हरमध्ये रहाणेने 4 बाऊंड्री मारल्या. पहिल्या चेंडूवर सिक्स मारला. त्यानंतर पुढच्या 4 चेंडूत 4 चौकार लगावले. एका ओव्हरमध्ये त्याने 23 रन्स वसूल केले. मागच्या सीजनमध्ये अजिंक्य रहाणे कोलकाता नाइट रायडर्सकडून खेळला होता. आयपीएल 2023 च्या लिलावात अजिंक्य रहाणेला सीएसकेने 50 लाख रुपयांच्या बेस प्राइसमध्ये विकत घेतलं होतं. त्याला मुंबई विरुद्ध सीएसकेकडून डेब्युची संधी मिळाली.

खराब सुरुवातीनंतर अजिंक्यने रचला विजयाचा पाया

8 व्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर पीयूष चावलाने अजिंक्य रहाणेला बाद केलं. अजिंक्य रहाणे 61 धावांवर खेळत असताना सूर्यकुमार यादवने त्याची कॅच घेतली. त्याने 27 चेंडूत 7 चौकार आणि 3 षटकार लगावले. अजिंक्य रहाणेने 225.92 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या. अजिंक्यची ही इनिंग सुरु असताना वानखेडेवर त्याच्या नावाचा गजर सुरु होता. चेन्नईला खराब सुरुवातीनंतर रहाणेने डाव संभाळला. त्याच्या CSK च्या विजयाचा पाया रचला.

Non Stop LIVE Update
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.