M S Dhoni | कोलकाता विरुद्ध पराभव, महेंद्रसिंह धोनी याचा 16 व्या मोसमानंतर IPL ला रामराम? निवृत्तीचे संकेत
चेन्नई सुपर किंग्सला कोलकाता नाईट रायडर्सकडून घरच्या मैदानात पराभव स्वीकारावा लागला. या पराभवानंतर महेंद्रसिंह धोनीने चाहत्यांचे आभार मानत निवृत्तीचे संकेत दिले. यावेळेस धोनी भावूक झालेला दिसून आला.
तामिळनाडू | आयपीएल 16 व्या मोसमात कोलकाता नाईट रायडर्स टीमने चेन्नई सुपर किंग्स टीमवर 6 विकेट्सने विजय मिळवला. केकेआरने 145 धावांचं आव्हान 4 विकेट्स गमावून 18.3 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. केकेआरने या विजयासह प्लेऑफच्या जर तरच्या आशा कायम ठेवल्या आहेत. तर चेन्नईच्या पराभवामुळे प्लेऑफची प्रतिक्षा आणखी वाढली आहे. त्यामुळे चेन्नईला आता दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध होणाऱ्या सामन्यात जिंकावं लागणार आहे. चेन्नई सुपर किंग्सचा हा या 16 व्या हंगामातील घरच्या मैदानातील अखेरचा सामना होता. त्यामुळे कॅप्टन महेंद्रसिंह धोनी याने आपल्या टीमसोबत संपूर्ण मैदानात फेरी मारत चाहत्यांचे आभार मानले.
चेन्नईचं प्लेऑफमधील स्थान अजून निश्चित नाही. त्यामुळे अधिकृतरित्या चेन्नईचा केकेआर विरुद्धचा हा या मोसामातील घरच्या मैदानातील अखेरचा सामना ठरला. धोनीला पाहण्यासाठी क्रिकेट चाहत्यांनी या हंगामात चेन्नईच्या प्रत्येक सामन्यात आवर्जून हजेरी लावली. त्यानुसारच एम ए चिदंबरम स्टेडियममध्येही चाहत्यांनी एकच गर्दी केली. धोनीला घरच्या मैदानात टीमला विजय मिळवून देण्यात अपयश आलं. मात्र धोनी चाहत्यांचे आभार मानायला विसरला नाही.
सामना संपल्यानंतर आधी केकेआरच्या रिंकू सिंह आणि वरुण चक्रवर्थी या दोघांनी धोनीला गाठलं. या दोघांनी जर्सीवर धोनीकडून त्याची ऑटोग्राफ घेतली. त्यानंतर धोनी आणि संपूर्ण चेन्नईच्या टीमने मैदानात फेरा मारायला सुरुवात केली. मात्र यामध्ये धोनी पुढे होता. धोनी चाहत्यांचे आभार मानत होता.
चाहत्यांना गिफ्ट म्हणून धोनीसह चेन्नईचे खेळाडू काहीतरी वस्तू फेकून देत होते. या दरम्यान टीम इंडियाचे माजी कर्णधार आणि कॉमेंटेटर सुनील गावसकर आले. गावसकरांनी धोनीकडून थेट आपल्या शर्टावर ऑटोग्राफ घेतला. गावसकरांच्या या कृतीमुळे धोनीच्या निवृत्तीवर जवळपास शिक्कामोर्तब झाला.
धोनीकडून गावसकरांना शर्टावर ऑटोग्राफ
???????! ?
A special lap of honour filled with memorable moments ft. @msdhoni & Co. and the ever-so-energetic Chepauk crowd ?#TATAIPL | #CSKvKKR | @ChennaiIPL pic.twitter.com/yHntEpuHNg
— IndianPremierLeague (@IPL) May 14, 2023
सामन्याचा धावता आढावा
चेन्नईने टॉस जिंकला. शिवम दुबे याच्या 48 धावांच्या जोरावर केकेआरला विजयासाठी 145 धावांचं आव्हान दिलं. केकेआरच्या निराशाजनक सुरुवातीनंतर कॅप्टन नितीश राणा आणि रिंकू सिंह या दोघांनी डाव सावरला. या दोघांनी 99 धावांची भागीदारी केली. रिंकूने या दरम्यान अर्धशतक पूर्ण केलं रिंकू 54 धावांवर आऊट झाला. त्यानंतर नितीश आणि आंद्रे रसेल या जोडीने केकेआरला विजयापर्यंत पोहचवलं. आंद्रेने नाबाद 2 आणि नितीशने 57 धावांची नाबाद आणि विजयी खेळी साकारली.
चेन्नई सुपर किंग्स प्लेइंग इलेव्हन | महेंद्रसिंह धोनी (कॅप्टन आणि विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, अंबाती रायुडू, शिवम दुबे, मोईन अली, रवींद्र जडेजा, दीपक चहर, तुषार देशपांडे आणि महेश तीक्षना.
कोलकाता नाईट रायडर्स प्लेइंग इलेव्हन | नितीश राणा (कर्णधार), रहमानउल्लाह गुरबाज (विकेटकीपर), जेसन रॉय, आंद्रे रसेल, रिंकू सिंग, शार्दुल ठाकूर, सुनील नारायण, वैभव अरोरा, हर्षित राणा, सुयश शर्मा आणि वरुण चक्रवर्ती.