MI vs CSK 2023 : Mumbai Indians विरुद्ध जिंकूनही धोनीच्या चेन्नईला दुसरा मोठा झटका

MI vs CSK 2023 : चेन्नई सुपर किंग्सने मुंबई इंडियन्स विरुद्ध विजय मिळवला आहे. पण चेन्नईच्या टीमसाठी एक चिंता वाढवणारी बाब आहे. त्याचा त्यांने पुढच्या काही सामन्यात फटका बसू शकतो.

MI vs CSK 2023 : Mumbai Indians विरुद्ध जिंकूनही धोनीच्या चेन्नईला दुसरा मोठा झटका
CSK vs MI IPL 2023Image Credit source: BCCI IPL
Follow us
| Updated on: Apr 09, 2023 | 8:27 AM

MI vs CSK IPL 2023 : मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्समध्ये काल वानखेडे स्टेडियमवर सामना झाला. यंदाच्या सीजनमधली दोन्ही टीम्सची ही पहिलीच मॅच होती. या मॅचमध्ये चेन्नई सुपर किंग्सने बाजी मारली. त्यांनी मुंबई इंडियन्सचा घरच्या मैदानात 7 विकेटने पराभव केला. मुंबई इंडियन्सने विजयासाठी दिलेलं 158 धावांच लक्ष्य चेन्नई सुपर किंग्सने 18.1 ओव्हर्समध्ये आरामात पार केलं. अजिंक्य रहाणेच्या आक्रमणाने मुंबईच्या गोलंदाजाची धार बोथट केली. मुंबईचाच हा खेळाडू चेन्नई सुपर किंग्सकडून खेळतो.

चेन्नईकडून अजिंक्य रहाणेने दमदार डेब्यु केला. पदार्पणाच्या सामन्यात त्याने वेगवान अर्धशतकी खेळी केली. त्याने केलेल्या आक्रमणातून मुंबईचे गोलंदाज शेवटपर्यंत सावरु शकले नाहीत. चेन्नईने आरामात यंदाच्या सीजनमधील दुसरा विजय मिळवला.

चेन्नईसाठी एक चिंता वाढवणारी बाब

चेन्नईच्या टीमने मुंबई इंडियन्स विरुद्ध दमदार विजय मिळवला असला, तरी त्यांच्यासाठी एक चिंता वाढवणारी बाब आहे. चेन्नईचा प्रमुख ऑलराऊंडर दीपक चाहरला दुखापत झालीय. मुंबई इंडियन्स विरुद्ध काल पहिली ओव्हर टाकल्यानंतर त्याला मैदान सोडाव लागलं. दीपक चाहरची हॅमस्ट्रिंगची दुखापत बळावली आहे.

सोडाव लागलं मैदान

पहिल्या ओव्हरमधील पाचवा चेंडू टाकल्यानंतर दीपक चाहरने फिजियोला बोलावलं. मैदानात त्याने ट्रीटमेंट घेतली. त्यानंतरही त्याला त्रास जाणवत होता. त्यामुळे ओव्हरमधील लास्ट चेंडू टाकल्यानंतर त्याने मैदान सोडलं.

किती सामन्यांना मुकणार?

दीपक चाहरची डाव्या पायाची हॅमस्ट्रिंग इंजरी पुन्हा बळावली आहे. त्यामुळे तो पुढच्या 4 ते 5 आयपीएल सामन्यांमध्ये खेळण्याची शक्यता कमी आहे. याच हॅमस्ट्रिंग इंजरीमुळे दीपक चाहर मागच्यावर्षी संपूर्ण आयपीएल सीजन खेळू शकला नव्हता. धोनी काय म्हणाला?

सुरेश रैना जियो सिनेमासाठी कॉ़मेंट्री करत होता. “दीपकची पुन्हा हॅमस्ट्रिंगची दुखापत बळावली आहे. तो कदाचित पुढचे 4 ते 5 सामने खेळणार नाही” असं रैना कॉमेंट्री करताना म्हणाला. “दीपक चाहर पहिल्या ओव्हरनंतर गोलंदाजी करु शकला नाही, तरीही चेन्नई सुपर किंग्सने विजय मिळवला, हे समाधानकारक आहे” असं कॅप्टन एमएस धोनी सामन्यानंतर म्हणाला.

दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.