IPL 2023 CSK Winner : महेंद्र सिंह धोनीच्या मुलीने जिंकली उपस्थितांची मनं! हार्दिक पांड्याला मिठी मारल्याचा व्हिडीओ व्हायरल
आयपीएल 2023 जेतेपदावर महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्स संघाने नाव कोरलं आहे. चेन्नई सुपर किंग्सने धोनीच्या नेतृत्वाखाली पाचव्यांदा नाव कोरलं आहे. या सामन्यानंतर धोनीच्या मुलीने उपस्थितांची मनं जिंकल्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
मुंबई : आयपीएल 2023 जेतेपदासाठी अंतिम फेरीत चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना रंगला. या सामन्यात गुजरात टायटन्सने 4 गडी गमवून 20 षटकात 214 धावा केल्या आणि विजयासाठी 215 धावांचं आव्हान दिलं. मात्र पहिल्यात षटकात पाऊस झाल्याने खेळ थांबवावा लागला. तसेच डकवर्थ लुईस नियमानुसार नवीन टार्गेट सेट करण्यात आलं. चेन्नईला 15 षटाकत 171 धावांचं आव्हान देण्यात आलं. हा सामना जिंकण्यासाठी शेवटच्या चेंडूपर्यंत थरार रंगला. शेवटच्या चेंडूवर चेन्नईला 4 धावांची आवश्यकता होती आणि स्ट्राईकला रवींद्र जडेजा होता. शेवटच्या चेंडूवर मोहित शर्माला चौकार ठोकत रवींद्र जडेजाने संघाला जेतेपद मिळवून दिलं आणि एकच जल्लोष झाला. चेन्नईच्या विजयात सर्वच मग्न होते. या जल्लोषात महेंद्रसिंह धोनीच्या मुलगी जिवाने हार्दिक पांड्याला मिठी मारल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
महेंद्र सिंह धोनी आणि हार्दिक पांड्या यांचे मैत्रिपूर्ण संबंध आहेत. हार्दिक पांड्याने महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघात पदार्पण केलं होतं. धोनीच्या नेतृत्वाखाली हार्दिक भारतीय संघात खेळला आहे. त्यामुळे या दोघांच्या मैत्रीचे अनेक किस्से आहेत. त्यामुळे गुजरातच्या पराभवानंतरही धोनीची मुलगी जिवाने हार्दिक पांड्याला मिठी मारली. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ अंतिम फेरीतला नसून क्वालिफायर 1 सामन्यानंतरचा आहे.
Emotions in plenty ?
Moments of elation, pure joy and the feeling of making it to the Final of #TATAIPL 2023 ?
Watch it all here ?? #GTvCSK | #Qualifier1 | @ChennaiIPL pic.twitter.com/4PLogH7fCg
— IndianPremierLeague (@IPL) May 24, 2023
सामन्यानंतर हार्दिक पांड्याने महेंद्र सिंह धोनीचं कौतुक करत म्हणाला की, “मला धोनीबाबत खूप आनंद वाटत आहे. जरी आज माझा पराभव झाला असला तरी मी त्याच्याकडून पराभूत झाल्याने काहीच वाटत नाही. चांगल्या गोष्टी चांगल्या लोकांसोबत कायम होत असतात. देवाचे आशीर्वाद कायम असतात. देवाचे आशीर्वाद माझ्यासोबतही आहेत पण आजची रात्र त्याची आहे.”
दोन्ही संघांची प्लेइंग 11
गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन) : वृद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, साई सुधारसन, हार्दिक पांड्या (कर्णधार), विजय शंकर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, मोहित शर्मा, नूर अहमद, मोहम्मद शमी
चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन) : रुतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, मोईन अली, अंबाती रायुडू, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (कर्णधार/विकेटकीपर), दीपक चहर, मथीशा पाथीराना, तुषार देशपांडे, महेश तीक्षणा