IPL 20232 : MI vs DC | सलग 3 सामने हरूनही डेव्हिड वॉर्नर म्हणतोय, आमच्यासाठी सकारात्मक…
यंदाच्या पर्वातील दिल्लीचा हा सलग चौथा पराभव आहे. सामन्यानंतर बोलताना दिल्लीचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर याने केलेल्या वक्तव्याची सर्वत्र एकच चर्चा होताना दिसत आहे.
मुंबई : मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यामध्ये झालेल्या सामन्यात मुंबई संघाने विजय मिळवलाय. यंदाच्या पर्वातील दिल्लीचा हा सलग चौथा पराभव आहे. सामन्यानंतर बोलताना दिल्लीचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर याने केलेल्या वक्तव्याची सर्वत्र एकच चर्चा होताना दिसत आहे.
काय म्हणाल वॉर्नर?
मागच्या तीन सामन्यात आम्ही हरलो. पण आज चुकीचा शेवट झाला, सगळं विलक्षण होतं. रोहित अव्वल खेळला. नॉर्खिया आणि मुस्तफजूरने चांगली गोलंदाजी केली. मला वाटतं, गेल्या तीन सामन्यांपासून आमच्यात काही सकारात्मक गोष्टी घडत आहेत. पण एका मागोमाग एक विकेट गमावल्याचा आम्हाला फटका बसतोय. आम्ही खेळलेल्या मागील तीन सामन्यांमधून बरेच सकारात्मक शिकलो असल्याचं डेव्हिड वॉर्नर म्हणाला.
डेव्हिड वॉर्नरनेही अर्धशतकी खेळी केली, मात्र तो संथगतीने खेळत असल्याने त्याच्यावर टीका होत आहे. जिओ सिनेमावर समालोचन करताना माजी खेळाडूही त्याच्या खेळीवरून त्याला ट्रोल करत असतात. वॉर्नरच्या अशा खेळण्यामुळे इतर फलंदाजांवर दबाव आल्याने ते मोठा शॉट मारण्याच्या प्रयत्नाात बाद होत आहेत. वॉर्नरने 47 चेंडूत 51 धावा केल्या यामध्ये त्याने सहा चौकार मारले. अक्षर पटेल याने मागून येत अर्धशतक करत आक्रमक फलंदाजी करत संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), मनीष पांडे, यश धुल, रोवमन पॉवेल, ललित यादव, अक्षर पटेल, अभिषेक पोरेल (विकेटकीपर), कुलदीप यादव, एनरिक नॉर्टजे, मुस्तफिजुर रहमान
मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), कॅमेरॉन ग्रीन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, नेहल वढेरा, हृतिक शोकीन, अर्शद खान, पियुष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ, रिले मेरेडिथ