Ambati Rayudu Retirement | अंबाती रायुडू याची तडकाफडकी निवृत्तीची घोषणा, ट्विट करत म्हणाला

गुजरात टायटन्स विरुद्धच्या अंतिम सामन्याआधी चेन्नई सुपर किंग्सचा स्टार आणि दिग्गज खेळाडूने तडकाफडकी निवृत्तीचा निर्णय घेतला आहे.

Ambati Rayudu Retirement | अंबाती रायुडू याची तडकाफडकी निवृत्तीची घोषणा, ट्विट करत म्हणाला
Follow us
| Updated on: May 28, 2023 | 6:47 PM

अहमदाबाद | चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात आयपीएल 16 व्या मोसमातील महामुकाबला हा नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पार पडणार आहे. चेन्नईची ही अंतिम फेरीत पोहचण्याची दहावी आणि गुजरातची सलग दुसरी वेळ ठरली आहे. आता या दोन्ही संघांमध्ये विजेतेपदासाठी कडवी झुंज पाहायला मिळणार आहे. मात्र त्याआधी चेन्नई सुपर किंग्स टीमच्या चाहत्यांसाठी अतिशय वाईट बातमी समोर आली आहे. चेन्नईच्या दिग्गज खेळाडूने गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्याआधी निवृत्ती घेत असल्याचा निर्णय घेतला आहे. या क्रिकेटरने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. त्यामुळे सीएसके चाहत्यांना मोठा झटका लागला आहे.

चेन्नई सुपर किंग्सचा स्टार बॅट्समन अंबाती रायुडू याने तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली आहे. रायुडूने ट्विट करत आपण आता क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचं म्हटलंय. रायुडूने या ट्विटमध्ये निवृत्ती जााहीर करताना सर्वांचे आभार मानले आहेत. तसेच गुजरात विरुद्धचा सामना हा माझ्या कारकीर्दीतील अखेरचा सामना असेल, असं रायुडूने म्हटलंय.

अंबाती रायुडू याचं ट्विट

रायुडूच्या ट्विटमध्ये काय?

” 2 दिग्गज टीम मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स. 204 सामने, 14 हंगाम, 11 प्लेऑफ, 8 फायनल, 5 ट्रॉफी. आज रात्री सहावी ट्रॉफी जिंकू. हा फार खूप मोठा प्रवास आहे. आयपीएलमधील आजचा सामना हा माझा अंतिम सामना असेल. ही महान स्पर्धा खेळताना मला खरोखर आनंद झालाय. तुम्हा सर्वांचे आभार. नो यू टर्न”, असं अंबातीने आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.

गुजरात टायटन्स टीम | हार्दिक पंड्या (कर्णधार), ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), शुबमन गिल, विजय शंकर, अभिनव मनोहर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, मोहम्मद शमी, नूर अहमद, मोहित शर्मा, जयंत यादव, जोशुआ लिटल, शिवम मावी, रविश्रीनिवासन साई किशोर, श्रीकर भारत, साई सुदर्शन, अल्झारी जोसेफ, प्रदीप सांगवान, मॅथ्यू वेड, दासून शनाका, ओडियन स्मिथ, दर्शन नळकांडे, उर्विल पटेल आणि यश दयाल.

चेन्नई सुपर किंग्स टीम | महेंद्रसिंह धोनी (कॅप्टन), डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे, अंबाती रायडू, सुभ्रांशु सेनापति, मोईन अली, शिवम दूबे, राजवर्धन हंगरगेकर, ड्वेन प्रिटोरियस, मिचेल सेंटनर, रविंद्र जडेजा, कायले जेमिन्सन, निशांत सिंधू, तुषार देशपांडे, मुकेश चौधरी, मतीशा पाथिराना, सिमरजीत सिंह, दीपक चाहर , प्रशांत सोलंकी, महेश थीक्ष्णा, शेख रशीद, भगत वर्मा आणि अजय मंडल.

पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट.
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी.
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं.
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली.
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?.
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण.
गृहमंत्रीपदावरून राज्याचं सरकार अधांतरी लटकतंय, हे कसलं मजबूत सरकार ?
गृहमंत्रीपदावरून राज्याचं सरकार अधांतरी लटकतंय, हे कसलं मजबूत सरकार ?.
राज कुंद्राला समन्स, आज ईडीसमोर हजेरी
राज कुंद्राला समन्स, आज ईडीसमोर हजेरी.
'शिंदेंची प्रकृती नाजूक, त्यांना मांत्रिकाची गरज अन्..', राऊतांचा टोला
'शिंदेंची प्रकृती नाजूक, त्यांना मांत्रिकाची गरज अन्..', राऊतांचा टोला.
काठावर पास होणाऱ्या मुलानं बोलणं योग्य नाही, शिरसाट यांचा कोणाला टोला?
काठावर पास होणाऱ्या मुलानं बोलणं योग्य नाही, शिरसाट यांचा कोणाला टोला?.