IPL 2023 | आयपीएलच्या 16 व्या मोसमाआधी मोठी गूडन्युज

आयपीएलच्या 16 व्या मोसमातील पहिला सामना हा 31 मार्चला गतविजेत्या गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात होणार आहे.

IPL 2023 | आयपीएलच्या 16 व्या मोसमाआधी मोठी गूडन्युज
wpl ipl 2023
Follow us
| Updated on: Feb 21, 2023 | 11:16 PM

मुंबई : आयपीएल 16 व्या मोसमाचं बिगूल वाजलंय. आयपीएलच्या या 16 मोसमाला 31 मार्चपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेचं आयोजन हे देशातील 12 स्टेडियमध्ये एकूण 74 सामने खेळवण्यात येणार आहेत. या मोसमाआधी क्रिकेट चाहत्यांसाठी अतिशय मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. क्रिकेट चाहत्यांना फुकटात आयपीएलचे सामने पाहता येणार आहेत.यावेळेस आयपीएलचे लाईव्ह सामने हे जिओ सिनेमावर फुकटात दाखवण्यात येणार आहेत. विशेष बाब म्हणजे एकूण 14 भाषांमध्ये जिओवर सामने पाहता येणार आहेत. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना आपल्या आवडत्या भाषेत सामने पाहता येतील.

मोसमातील पहिला सामना हा 31 मार्चला गतविजेत्या गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात होणार आहे. आयपीएलच्या 16 व्या मोसमातील सामन्यांच्या आयोजनाचा मान हा यंदा गुवाहाटी आणि धर्मशालाला मिळाला आहे. त्यामुळे आता अहमदाबाद, मोहाली, लखनऊ, हैदाराबाद, बंगळुरु, चेन्नई, दिल्ली, कोलकाता, जयपूर, मुंबई, गुवाहाटी आणि धर्मशाला इथे सामन्यांचं आयोजन करण्यात आलं आहे.

आयपीएलमध्ये सहभागी होणाऱ्या एकूण 10 संघाची विभागणी ही 2 गटांमध्ये करण्यात आली आहे. ग्रुप ए आणि ग्रुप बी असे 2 ग्रुप करण्यात आले आहेत.

हे सुद्धा वाचा

ग्रुप ए मधील टीम

मुंबई इंडियन्स, कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिट्ल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स.

ग्रुप बी टीम

चेन्नई सुपर किंग्स, पंजाब किंग्स, सनरायजर्स हैदराबाद, रॉयल चँलेजर्स बंगळुरु आणि गुजरात टायटन्स

सॅम करन महागडा खेळाडू

दरम्यान इंग्लंडचा सॅम करन हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. कोचीत पार पडलेल्या मिनी ऑक्शनमध्ये पंजाब किंग्सने सॅमसाठी 18 कोटी 50 लाख रुपये मोजले. त्यामुळे सॅम या 16 व्या हंगामात कशी कामगिरी करतो, याकडे टीम मॅनेजमेंटचं लक्ष असणार आहे.

आयपीएलमधील सर्वात यशस्वी टीम

मुंबई इंडियन्स आयपीएलमधील सर्वात यशस्वी टीम आहे. मुंबईने एकूण 15 मोसमांपैकी 5 वेळा विजेतेपद पटकावलं आहे. मुंबईने 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 अशा एकूण 5 पर्वांमध्ये आयपीएल ट्रॉफी उंचावली आहे. मुंबईच्या गोटात यावेळेस आणखी अनुभवी खेळाडू दाखल झाले आहेत.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.