IPL 2023, GT vs CSK | पहिल्या सामन्यात गुजरात विरुद्ध चेन्नई आमनेसामने, जाणून घ्या सर्वकाही
आयपीएलच्या 16 व्या हंगामाला 31 मार्चपासून सुरुवात होत आहे. या मोसमातील सलामीचा सामना हा गतविजेता गुजरात जायंट्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात खेळवण्यात येणार आहे.
अहमदाबाद | आयपीएल 16 व्या मोसमाच्या महाकुंभाला अवघ्या काही तासांनी सुरुवात होणार आहे. या मोसमाला रंगारंग कार्यक्रमाने सुरुवात होणार आहे. या कार्यक्रमात बॉलिवूडमधील कलाकारांचा परफॉर्मन्स असणार आहे. त्यानंतर सलामीच्या सामन्याला सुरुवात होणार आहे. हा सामना आयपीएलच्या 15 व्या मोसमाचा विजेता संघ राहिलेल्या गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात खेळवण्यात येणार आहे. चेन्नई सुपर किंग्सचं कर्णधारपद महेंद्रसिंह धोनी याच्याकडे आहे. तर हार्दिक पंड्या गुजरात जायंट्सची कॅप्टन्सी करणार आहे. दरम्यान या सामन्याबाबत आपण सविस्तर जाणून घेऊयात.
पहिला सामना केव्हा?
गुजरात विरुद्ध चेन्नई यांच्यात सलामीचा सामना हा 31 मार्च रोजी खेळवण्यात येणार आहे.
सामन्याचं आयोजन कुठे?
या सामन्याचं आयोजन हे अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये करण्यात आलंय.
सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
गुजरात विरुद्ध चेन्नई यांच्यातील या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 7 वाजता टॉस होणार आहे.
लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहता येणार?
गुजरात विरुद्ध चेन्नई यांच्यातील सामना हा जिओ सिनेमा एपवर पाहता येणार आहे.
चेन्नई सुपरकिंग्स टीम
एमएस धोनी (कर्णधार), डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, अंबाती रायुडू, सुभ्रांशु सेनापति, मोईन अली, शिवम दूबे, राजवर्धन हंगरगेकर, ड्वेन प्रिटोरियस, मिचेल सेंटनर, रविंद्र जडेजा, तुषार देशपांडे, मुकेश चौधरी, मथीशा पथिराना, सिमरजीत सिंह, दीपक चहर, प्रशांत सोलंकी, महेश थिक्शाना, अजिंक्य रहाणे, बेन स्टोक्स, शेख रशीद, निशांत सिंधु, कायले जेमीन्सन, अजय मंडल आणि भगत वर्मा.
गुजरात टायटन्स टीम
हार्दिक पांड्या (कॅप्टन), राशिद खान, राहुल तेवतिया, शुभमन गिल, मोहम्मद शमी, शिवम मावी, जोशुआ लिटिल, यश दयाल, डेविड मिलर, आर साई किशोर, अभिनव सदरंगानी, अल्जारी जोसेफ, मैथ्यू वेड, केन विलियमसन, रिद्धिमान साहा, जयंत यादव, विजय शंकर, केएस भरत, ओडियन स्मिथ, मोहित शर्मा, नूर अहमद, उर्विल पटेल, प्रदीप सांगवान, दर्शन नालकंडे आणि साईं सुदर्शन.