IPL 2023 : करियर धोक्यात घालून आधी हिरो बनला, मग दीड तासात 3.2 कोटींचा खेळाडू बनला झिरो
IPL 2023 : आयपीएल असंच आहे, इथे हिरोचा झिरो, तर झिरोचा हिरो व्हायला वेळ लागत नाही. आयपीएलमध्ये क्रिकेटचा रोमांच आहे. कधी, कुठल्या क्षणाला मॅच कशी फिरेल? हे कोणीही सांगू शकत नाही.
GT vs KKR IPL 2023 : कोलकाता नाइट रायडर्स आणि गुजरात टायटन्समधील आयपीएल 2023 चा 13 वा सामना रिंकू सिंहने गाजवला. त्याने लास्ट ओव्हरमध्ये 5 सिक्स मारुन गुजरातच्या तोंडातून विजयाचा घास हिरावला. रिंकूने त्याच्या खेळाने सर्वांना जिंकून घेतलच. पण त्याचवेळी यश दयालची सुद्धा चर्चा आहे. या मॅचमध्ये यश दयाल दीड तासात हिरोचा झिरो बनला. आपलं करियर संकटात टाकून यश दयाल हिरो बनला होता. त्याने केकेआरच्या रहमानुल्लाह गुरबाजचा धोकादायक झेल घेतला. त्यासाठी त्याने धोका पत्करला.
दयालच्या कॅचने अनेकांना हैराण करुन सोडलं. पण त्यानंतर दीड तासातच यश दयाल गुजरातच्या पराभवाच कारण बनला. कोलकाता नाइट रायडर्सला अखेरच्या ओव्हरमध्ये विजयासाठी 29 धावांची गरज होती. त्यावेळी रिंकू सिंहने अशक्य ते शक्य करुन दाखवलं. रिंकूने जोरदार धुलाई केली, सलग 5 सिक्स ठोकून केकेआरला 3 विकेटने विजय मिळवून दिला.
What an effort from Yash Dayal to complete the catch#GTvsKKR pic.twitter.com/85BNPdQ73N
— Chandra Shekar (@Shekar4266) April 9, 2023
तिसऱ्या ओव्हरमध्ये धडक
गुजरात टायटन्सने 3.2 कोटी रुपयांमध्ये विकत घेतलेल्या यश दयालने लास्ट ओव्हरमध्ये 31 धावा दिल्या. त्यालाही स्वत:वर विश्वास बसला नाही. याआधीच तिसऱ्या ओव्हरमध्ये त्याची टक्कर झाली. गुरबाजची कॅच पकडण्यासाठी विकेटकीपर भर आणि यश दोघे पळाले. दोघांनी डाइव्ह मारली. या दरम्यान दोघे वाईट पद्धतीने परस्परांना धडकले. हीरो ते झिरो
भरतच्या हातामुळे दयालच डोक जमिनीवर आपटलं. पण, तरीही दयालने कॅच सोडली नाही. गुरबाजला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. भरत आणि दयालमध्ये जितकी जोरदार टक्कर झाली, त्यामुळे दोघांना दुखापत होण्याची भिती होती. गुरबाजने फक्त 15 रन्स केल्या. त्या कॅचमुळे यश हिरो बनला. पण लास्ट ओव्हरमध्ये त्याने 31 धावा दिल्या. पाहता पाहता यश हिरोचा झिरो झाला होता.