GT vs KKR : रिंकू सिंग ठरला मॅचविनर पण खारूताई सारखं काम करणाऱ्या ‘या’ मराठमोळ्या खेळाडूला विसरलात?
सर्वजण रिंकूचं कौतुक करत आहेत मात्र तुम्हाला माहिती का मराठमोळा खेळाडू ज्यामुळे रिंकू सिंगने ही धडाकेबाज खेळी केली.
मुंबई : केकेआर आणि गुजरात टायटन्स यांच्यामधील सामन्यामध्ये रिंकू सिंग याने केलेल्या दमदार खेळीच्या जोरावर 3 विकेट्सने विजय मिळवला आहे. एक वेळ अशी होती की हा सामना पूर्णपणे गुजरत टायटन्सच्या पारड्यात होता. मात्र रिंकू सिंगने केलेल्या तुफानी खेळीच्या जोरावर केकेआरने हा सामना आपल्या खिशात घातला. सर्वजण रिंकूचं कौतुक करत आहेत मात्र तुम्हाला माहिती का मराठमोळा खेळाडू ज्यामुळे रिंकू सिंगने ही धडाकेबाज खेळी केली.
अखेरच्या ओव्हरमध्ये केकेआरला 29 धावांची आवश्यकता होती. गुजरातकडून यश दयाळ बॉलिंग करत होता. स्ट्राईकला उमेश यादव होता त्याने 1 धाव घेतली. त्यानंतर रिंकू सिंग स्ट्राईकला आला आणि त्याने दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या चेंडूवर सिक्सर मारला. शेवटच्या चेंडूवर 4 धावांची गरज होती त्यावरही पठ्ठ्याने सिक्स मारत सामना जिंकून दिला. उमेश यादव याने 1 धाव नसती घेतली तर सामन्याचा निकाल कदाचित वेगळा लागला असता.
गुजरात संघाने प्रथम फलंदाजी करताना केकेआरला 205 धावांचं लक्ष दिलं होतं या लक्षाचा पाठलाग करताना केकेआरची सुरुवात म्हणावी अशी काही झाली नाही कारण तिसऱ्या ओव्हरमध्ये गुरबाजला मोहम्मद शमीने बाद केलं. त्यानंतर इम्पॅक्ट प्लेयर म्हणून आलेल्या व्यंकटेश अय्यर याने सामन्याच रूप पालटून टाकलं होतं. मात्र अय्यर 83 धावांवर बाद झाला आणि राशिद खान याने हॅट्रिक घेत सामन्यात ट्विस्ट आणला. परंतु मैदानात रिंकू सिंगने सर्व चित्रच बदलून टाकलं.
गुजरात टायटन्स प्लेइंग इलेव्हन | रशीद खान (कॅप्टन), वृद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, साई सुदर्शन, विजय शंकर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, अभिनव मनोहर, मोहम्मद शमी, अल्झारी जोसेफ आणि यश दयाल.
कोलकाता नाईट रायडर्स प्लेइंग इलेव्हन | रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), एन जगदीसन, नितीश राणा (C), रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनील नरेन, शार्दुल ठाकूर, सुयश शर्मा, लॉकी फर्ग्युसन, उमेश यादव आणि वरुण चक्रवर्ती.