Arjun Tendulkar | अर्जुन तेंडुलकर याचा पर्पल कॅप विनर गोलंदाजाच्या बॉलिंगवर कडकडीत सिक्स

मुंबई इंडियन्सचा स्टार आणि युवा खेळाडू अर्जुन तेंडुलकर याने पर्पल कॅप विनर गोलंदाजाच्या बॉलिंगवर खणखणीत सिक्स ठोकला आहे. या सिक्सचा व्हीडिओ व्हायरल झाला आहे.

Arjun Tendulkar | अर्जुन तेंडुलकर याचा पर्पल कॅप विनर गोलंदाजाच्या बॉलिंगवर  कडकडीत सिक्स
Follow us
| Updated on: Apr 26, 2023 | 12:30 AM

गांधीनगर | आयपीएल 16 व्या मोसमातील 35 व्या सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स आमनेसामने होते. या सामन्यात मुंबई इंडियन्सचा सलग दुसरा पराभव झाला. तर गुजरात टायटन्सचा हा या मोसमातील पाचवा विजय ठरला. गुजरातने पहिले बॅटिंग करताना मुंबईला विजयासाठी 208 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र गुजरातच्या बॉलिंगसमोर मुंबईला 9 विकेट्स गमावून 20 ओव्हरमध्ये 152 धावाच करता आल्या. मुंबईचा पराभव जरी झाला असला, तरी सोशल मीडियावर सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याची चर्चा रंगली आहे. त्याचं कारणही तसंच आहे. अर्जुन याने आपल्या आयपीएल कारकीर्दीतील पहिलावहिला आणि खणखणीत सिक्स मारला आहे.

मुंबईची 208 धावांचा पाठलाग करताना निराशाजनक सुरुवात झाली होती. गुजरातच्या गोलंदाजांनी मुंबईला ठराविक अंतराने झटके देणं सुरुच ठेवलं होतं. त्यामुळे मुंबईच्या एकाही फलंदाजाला अपेक्षित अशी मोठी खेळी साकारता आली नाही. त्यामुळे झटपट विकेट गमावल्याने सामना एकतर्फी झाला होता. विकेट गेल्याने अर्जुनला बॅटिंगची संधी मिळाली. गुजरातचा विजय निश्चित झाला होता, आता बाकी होती ती औपचारिकता. मोहित शर्मा, एका काळचा आयपीएलमधील पर्पल कॅप विनर. मोहित शर्मा मुंबईच्या डावातील शेवटची म्हणजेच 20 वी ओव्हर टाकायला आला.

अर्जुन तेंडुलकर स्ट्राईरवर होता. मोहितने टाकेलला बॉल अर्जुनने टप्प्यात येताच करेक्ट कार्यक्रम केला. अर्जुनने जागेवरुन खडेखडे कडक सिक्स ठोकला. अर्जुनच्या या सिक्समध्ये क्रिकेट चाहत्यांना युवराज सिंह याची झलक दिसली. या सामन्यात मुंबईचा पराभव झाला. मात्र अर्जुन याने सिक्स ठोकत मार्केट खाल्लं.

अर्जुनला आणखी फटके मारायची संधी होती. मात्र मोहितच्या अनुभवापुढे अर्जुनचं नवखपणं लपू शकलं नाही. मोहितने अर्जुनला त्याच ओव्हरमधील चौथ्या चेंडूवर जोशुआ लिटील याच्या हाती कॅच आऊट केलं.अर्जुनने 9 बॉलमध्ये एकमेव सिक्सच्या मदतीने 13 धावा केल्या. अर्जुनची ही त्याच्या आयपीएल कारकीर्दीतील पहिलीवहिली आणि सर्वोच्च धावसंख्या ठरली.

अर्जुनने त्याआधी चिवट बॉलिंग केली. पंजाब किंग्स विरुद्ध शनिवारी 22 एप्रिल रोजी एका ओव्हरमध्ये 31 धावा लुटवल्याने अर्जुन तेंडुलकर याच्यावर सडकून टीका करण्यात आली. मात्र त्यानंतर स्वत:च्या गोलंदाजीत अर्जुनने कमालीची सुधारणा केली. अर्जुनने गुजरात विरुद्धच्या या सामन्यात 2 ओव्हरमध्ये अवघ्या 4. 50 च्या इकॉनॉमी रेटने 9 धावा देत 1 विकेटही घेतली.

अर्जुन तेंडुलकर याचा पहिलावहिला आयपीएल सिक्स

गुजरात टायटन्स प्लेइंग इलेव्हन | हार्दिक पंड्या (कॅप्टन), शुबमन गिल, ऋद्धीमान साहा (विकेटकीपर), विजय शंकर, अभिनव मनोहर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, मोहित शर्मा, राशिद खान, मोहम्मद शमी आणि नदीम अहमद.

मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), कॅमरुन ग्रीन, सूर्यकुमार यादव, टीम डेव्हिड, के कार्तिकेय सिंग, एन वडेरा, रायली मेरेडिथ, पीयूष चावला, अर्जुन तेंडुलकर आणि जेसन बेहरेनडॉर्फ.

कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....