GT vs MI : 6,6,6, हान की बडीवsss | राहुल तेवतिया याने 400 च्या स्ट्राईक रेटने मुंबईला झोडत केल्या ‘इतक्या’ धावा

आज पुन्हा एकदा मुंबईची गोलंदाजी किती ढिसार आहे ती उघडी पडली. आधीच्यांनी कमी फोडलं नाहीतर शेवटला आलेल्या राहुल तेवतिया याने 400 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या.

GT vs MI : 6,6,6, हान की बडीवsss | राहुल तेवतिया याने 400 च्या स्ट्राईक रेटने मुंबईला झोडत केल्या 'इतक्या' धावा
Follow us
| Updated on: Apr 25, 2023 | 10:02 PM

मुंबई :  गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडिअन्स यांच्यात सुरू असलेल्या सामन्यामध्ये गुजरातने  धुमधडाकेबाज खेळी केली आहे. प्रथम फलंदाजी करताना गुजरातने 207 धावांचा डोंगर उभारला आहे. गुजरातच्या शुबमन गिल 56 धावा, अभिनव मनोहर 42 धावा , डेव्हिड मिलर 46 धावा यांच्या आक्रमक खेळीच्या जोरावर गुजरात संघाने 200 चा आकडा पार केला. आज पुन्हा एकदा मुंबईची गोलंदाजी किती ढिसार आहे ती उघडी पडली. आधीच्यांनी कमी फोडलं नाहीतर शेवटला आलेल्या राहुल तेवतिया याने 400 च्या स्ट्राईक रेटने 20 धावा केल्या.

राहुलने पाच बॉल खेळले यामध्ये त्याने 3 षटकार मारत नाबाद 20 धावांची खेळी केली. पहिल्याच बॉलपासून राहुलने मुंबईच्या गोलंदाजांना फोडायला सुरूवात केली. शेवटच्या ओव्हरमध्ये त्याने दोन षटकार मारत कडक सुरूवात केली होती. तिसऱ्या चेंडूवर एकच धाव घेता आली. राहुल याला जर आणखी 10 चेंडू मिळाले असते तर त्याने संघाला आणखी धावा करून दिल्या असत्या.

गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सला विजयासाठी 208 धावांचं मजबूत आव्हान दिलं आहे. गुजरातने 6 विकेट्स गमावून निर्धारित 20 ओव्हरमध्ये 207 धावा केल्या. गुजरातकडून शुबमन गिल याने सर्वाधिक 56 धावांची खेळी केली. गिल याने 7 चौकार आणि 1 सिक्स ठोकला. मिलरने अखेरच्या काही चेंडूंपर्यंत जोरदार फटकेबाजी करत 22 बॉलमध्ये 2 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 46 धावा केल्या. अभिनव मनोहर यानेही टॉप गिअर टाकत 21 बॉलमध्ये 42 रन्सची इनिंग केली.

अखेरच्या काही बॉलमध्ये राहुल तेवितिया याने 5 बॉलमध्ये 3 सिक्ससह नाबाद 20 धावा केल्या. तर विजय शंकर याने 19, कॅप्टन हार्दिक पंड्या याने 13, ऋद्धीमान साहा याने 4 आणि राशिद खाने याने 2* धावा केल्या. मुंबईकडून पियूष चावला याने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तर कुमार कार्तिकेय, अर्जुन तेंडुलकर, बेहरनडॉर्फ आणि रिले मेरेडिथ या चौकडीने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

गुजरात टायटन्स प्लेइंग इलेव्हन | हार्दिक पंड्या (कॅप्टन), शुबमन गिल, ऋद्धीमान साहा (विकेटकीपर), विजय शंकर, अभिनव मनोहर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, मोहित शर्मा, राशिद खान, मोहम्मद शमी आणि नदीम अहमद.

मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), कॅमरुन ग्रीन, सूर्यकुमार यादव, टीम डेव्हिड, के कार्तिकेय सिंग, एन वडेरा, रायली मेरेडिथ, पीयूष चावला, अर्जुन तेंडुलकर आणि जेसन बेहरेनडॉर्फ.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.