चालला, तर तुरुपचा एक्का, नाहीतर…. 2 कोटींचा खेळाडू Hardik Pandya साठी ठरु शकतो मॅचविनर

IPL 2023 Gujarat Titans : या खेळाडूच नाव खूप मोठं आहे. फक्त गुजरात टायटन्ससाठी त्याने तसं परफॉर्म केलं, तर बल्ले-बल्ले. Hardik Pandya या खेळाडूबाबत रिस्क घ्यावी लागेल.

चालला, तर तुरुपचा एक्का, नाहीतर.... 2 कोटींचा खेळाडू Hardik Pandya साठी ठरु शकतो मॅचविनर
Gujarat TitansImage Credit source: PTI
Follow us
| Updated on: Mar 30, 2023 | 8:45 AM

IPL 2023 Gujarat Titans : इंडियन प्रीमिअर लीगच्या 16 व्या हंगामाला उद्यापासून सुरुवात होत आहे. 31 मार्चला गतविजेते गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्समध्ये पहिला सामना होणार आहे. गुजरात टायटन्सची टीम आपल्या जेतेपदाचा बचाव करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. यंदाही गुजरात टायटन्सची टीम विजेतेपदाची प्रबळ दावेदार आहे. गुजरात टायटन्सने मागच्यावर्षी आयपीएलमध्ये डेब्यु केला. पहिल्याच सीजनमध्ये त्यांनी विजेतेपदाला गवसणी घातली.

यंदाच्या सीजनमध्ये गुजरात टायटन्सकडे असा खेळाडू आहे, त्याच्या समावेशाने टीमचा फायदा होईल आणि तोटाही. हार्दिक पंड्याला ही रिस्क घ्यावी लागेल. गुजरात टायटन्सवर हा डाव उलटा सुद्धा पडू शकतो.

गुजरातकडे दोन फिनिशर

मागच्या सीजनमध्ये बऱ्याच सामन्यात गुजरात टायटन्सच्या टॉप ऑर्डरला संघर्ष करावा लागला होता. मिडल ऑर्डरमध्ये कॅप्टन हार्दिक पंड्या, डेविड मिलर आणि राहुल तेवतिया यांनी प्रत्येकवेळी टीमचा डाव सावरला होता. मिलर आणि तेवतिया गुजरातसाठी फिनिशर ठरले होते. ऋद्निमान साहा, मॅथ्यू वेड, विजय शंकर हे खेळाडू ओपनर आणि तिसऱ्या क्रमांकावर फार मोठं योगदान देऊ शकले नाहीत.

2 कोटी बेस प्राइस

यंदाच्या सीजनमध्येही गुजरात टायटन्सकडे हेच खेळाडू आहेत. पण आपल्या फलंदाजीला बळकटी आणण्यासाठी गुजरातने डिसेंबर 2022 मिनी ऑक्शनमध्ये एका अनुभवी फलंदाजाला विकत घेतलय. तो मागच्या सीजनपर्यंत आयपीएलमध्येच एका टीमचा कॅप्टन होता. पण तो आणि त्याची टीम विशेष काही करु शकले नाहीत. हा खेळाडू आहे, न्यूझीलंडचा दिग्गज कॅप्टन केन विलियमसन. गुजरातने त्याला 2 कोटीच्या बेस प्राइसला विकत घेतलय.

स्ट्राइक रेट फक्त 117

प्रथमदर्शनी हा चांगला सौदा वाटतो. पण T20 फॉर्मेटमध्ये विलियमसनच प्रदर्शन फार उत्साहवर्धक नाहीय. मागच्या 2-3 महिन्यात टेस्ट क्रिकेटमध्ये त्याने चांगली कामगिरी केलीय. मागच्यावर्षी झालेल्या टी 20 वर्ल्ड कप नंतर विलियमसनने नोव्हेंबर महिन्यात फक्त भारताविरुद्ध एकमेव टी 20 सामना खेळलाय. त्यात त्याने 61 धावा केल्या. पण त्याचा स्ट्राइक रेट फक्त 117 चा होता. त्याच्याकडे अनुभव आणि क्षमता आहे

मागच्या आयपीएल सीजनमध्ये विलियमसनने 93 च्या स्ट्राइक रेटने फक्त 216 धावा केल्या. 2021 सीजनमध्ये त्याने 113 च्या स्ट्राइक रेटने 266 धावा केल्या. त्यामुळे विलियमसन गुजरात टायटन्ससाठी दुधारी तलवारीसारखा आहे. त्याच्याकडे अनुभव आणि क्षमता आहे. पण टी 20 मधील त्याची कामगिरी फार प्रभावी नाहीय.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.