Cancelled..! गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्यापूर्वी वादाची ठिणगी, काय झालं पाहा व्हिडीओ
आयपीएल 2023 स्पर्धेतील क्वॉलिफायर 2 सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार आहे. मात्र या सामन्यापूर्वीत फॅन्समध्ये जोरदार राडा झाला आहे.

मुंबई : आयपीएल 2023 स्पर्धेतील क्वॉलियफायर 2 सामना मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात होत आहे. या सामन्यातील विजयी संघ अंतिम फेरीत चेन्नई सुपर किंग्सशी भिडणार आहे. त्यामुळे या महत्त्वपूर्ण सामन्यासाठी फॅन्सची जोरदार तयारी सुरु झाली आहे. हा सामना शुक्रवारी 26 मे रोजी होणार आहे. यासाठी मुंबईच्या फॅन्सनी ठरवलेले सर्व प्लान कॅन्सल केले आहेत. यासाठी त्यांनी आपल्या प्रियजनांसोबत वाद घालत आहे. हा मजेशीर व्हिडीओ मुंबई इंडियन्स फ्रेंचाईसी आपल्या सोशल मीडिया खात्यावर शेअर केला आहे. मुंबईच्या चाहत्यांनी आधीच काही प्लान ठरवले होते आणि ते प्लान कॅन्सल करण्यासाठी धडपड सुरु आहेत. तसेच 26 मे रोजी अहमदाबादला जाण्याची तयारी सुरु केली आहे.
मुंबई इंडियन्सने आपल्या सोशल मीडिया खात्यावर शेअर केलेल्या व्हिडीओसाठी एक पोस्ट लिहिली आहे. त्यात त्यांनी लिहिलं आहे की, ‘पलटण, 26 तारखेचा प्लान कॅन्सल करण्यासाठी काय बहाणे बनवत आहात.’ हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ हजारो लोकांनी पाहिला असून लाईक आणि शेअर करत आहेत.
Paltan, 26th ke plans cancel karne ke liye kya excuse de rahe ho? ??#OneFamily #MumbaiMeriJaan #MumbaiIndians #TATAIPL #IPL2023 @Funcho_official @focusedindian pic.twitter.com/hRaX17SfmG
— Mumbai Indians (@mipaltan) May 25, 2023
गुजरात आणि मुंबई या स्पर्धेत तिसऱ्यांदा आमनेसामने येत आहेत. पहिल्या सामन्यात गुजरातने मुंबईचा 55 धावांनी पराभव झाला होता. दुसऱ्या सामन्यात मुंबईने या पराभवाची परतफेड केली. मुंबईने गुजरातला 27 धावांनी पराभूत केले होते.
दोन्ही संघांचा संपूर्ण स्क्वॉड
मुंबईचा पूर्ण स्क्वॉड: रोहित शर्मा, कॅमरुन ग्रीन, राघव गोयल, विष्णु विनोद, नेहल वढेरा, टिम डेविड, पीयूष चावला, ड्वेन यानसन, शम्स मुलानी, रमनदीप सिंह, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, अरशद खान, कुमार कार्तिकेय, ऋतिक शौकीन, बेहरनडॉर्फ, डेवाल्ड ब्रेविस, जोफ्रा आर्चर, अर्जुन तेंडुलकर, आकाश मधवाल, इशान किशन आणि ट्रिस्टन स्टब्स.
गुजरातचा पूर्ण स्क्वॉड : हार्दिक पंड्या, अभिनव मनोहर, शुभमन गिल, डेविड मिलर, मॅथ्यू वेड, ऋद्धिमान साहा, बी साई सुदर्शन, दर्शन नालकंडे, जयंत यादव, प्रदीप सांगवान, राहुल तेवतिया, शिवम मावी, विजय शंकर, अलजारी जोसफ, मोहम्मद शमी, नूर अहमद, साई किशोर, राशिद खान, यश दयाल, केन विलियमसन, जोशुआ लिटिल, ओडीन स्मिथ, उर्विल पटेल, केएस भरत आणि मोहित शर्मा.