Rinku Singh | केंद्रा लस्ट रिंकु सिंह याच्या मॅचविनिंग खेळीच्या प्रेमात, थेट ट्विट करत म्हणाली…
कोलकाता नाईट रायडर्सच्या 25 वर्षाच्या युवा रिंकू सिंह याने गुजरात जायंट्स विरुद्ध शेवटच्या ओव्हरमध्ये सलग 5 सिक्स खेचत टीमला सनसनाटी विजय मिळवून दिला.
मुंबई | आयपीएल 16 व्या मोसमात रविवारी 9 एप्रिल रोजी डबल हेडर सामन्यांचं आयोजन करण्यात आलं. या डबल हेडरमधील पहिला सामना हा गुजरात टायटन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळवण्यात आला. या मोसमातील आतापर्यंतचा हा थरारक, रंगतदार आणि सनसनाटी असा सामना ठरला. क्रिकेट चाहत्यांसाठी हा सामना पैसा वसूल ठरला. कोलकाता नाईट रायडर्सचा रिंकु सिंह हा विजयाचा हिरो ठरला. रिंकु सिंह याने गुजरातने जवळपास जिंकलेला सामना एकहाती फिरवला आणि कोलकाताला विजयी केलं. गुजरातने केकेआरला विजयासाठी 205 रन्सचं टार्गेट दिलं होतं. केकेआरनेही अखेरपर्यंत चांगली झुंज दिली.
केकेआरला सामना जिंकण्यासाठी शेवटच्या ओव्हरमध्ये 29 धावांची गरज होती. या अशा वेळेस रिंकु सिंह याने 5 बॉलमध्ये 5 सिक्स उडवत केकेआरला सनसनाटी विजय मिळवून दिला. रिंकूच्या या खेळीनंतर त्याचं सोशल मीडियावर आणि सर्वच स्तरातून कौतुक आहे.
रिंकू सिंह या खेळीमुळे काही मिनिटात स्टार झाला. त्याचं कौतुक करण्यात आलं. अशात केंद्रा लस्ट हीने देखील रिंकूचं कौतुक केलं आहे. केंद्राने ट्विट करत रिंकूचं कौतुक केलंय. केंद्राने रिंकू सिंह याच्यासोबत केकेआरच्या लोगोचा बॅकग्राउंड असेलला फोटो ट्विट केला आहे. तसेच या फोटोला फायर आणि लव्ह इमोजीसह ‘रिंकू-द किंग’ असं कॅप्शन दिलंय. रिंकूसाठी केलेलं हे ट्विट अवघ्या काही तासांमध्ये व्हायरल झालंय. हे ट्विट आतापर्यंत 8 हजार जणांनी लाईक केलंय. तसेच 1 हजार जणांनी ट्विट रिट्विट केलंय.
केंद्रा लस्ट हीचं रिंकु सिंह याच्यासाठी ट्विट
रिंकू सिंह याला ऑफर
रिंकू याच्या या खेळीची केकेआरचा मालक आणि त्याची लेक शाहरुख खान आणि सुहाना खान या दोघांनी कौतुक केलं. आता यामध्ये केंद्रा हीचीही भर पडली आहे. केंद्राने रिंकूसोबतचा फोटो शेअर केला. हे कोणत्याही मोठ्या ऑफर पेक्षा कमी नाही. या फोटोवरुन केंद्राला रिंकूसोबत मैत्री करायची आहे, असा अंदाज नेटकऱ्यांनी बांधला आहे.
दरम्यान रिंकू याने निर्णायक क्षणी 21 बॉलमध्ये 6 सिक्स आणि 1 फोरच्या मदतीने 228.57 च्या तुफानी स्ट्राईक रेटने नाबाद 48 धावांची निर्णायक आणि मॅचविनिंग खेळी केली. रिंकूची ही खेळी त्याच्या आयुष्याला मोठी कलाटणी देणारी ठरली. रिंकूने यासह टीम इंडियाचे दारही ठोठावले आहेत. रिंकूला आगामी काळात टीम इंडियात संधी देण्यात यावी, असा सूर सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.