SRH Vs LSG : लखनऊनची टॉप 4 मध्ये एन्ट्री, हैदराबादचा पराभव राजस्थान आणि मुंबईला पडणार महागात! वाचा गुणतालिकेत नेमकं काय झालं

आयपीएल 2023 प्लेऑफसाठी जबरदस्त चुरस निर्माण झाली आहे. लखनऊ सुपर जायंट्सने हैदराबादला पराभूत करत पुन्हा एकदा सुपर 4 मध्ये स्थान मिळवलं आहे. तर हैदराबादचं आव्हान जवळपास संपुष्टात आलं आहे. दुसरीकडे मुंबई आणि राजस्थानचं टेन्शन वाढलं आहे.

SRH Vs LSG : लखनऊनची टॉप 4 मध्ये एन्ट्री, हैदराबादचा पराभव राजस्थान आणि मुंबईला पडणार महागात! वाचा गुणतालिकेत नेमकं काय झालं
SRH Vs LSG : हैदराबादचं गणित फिस्कटलं, लखनऊ पुन्हा सुपर 4 मध्ये! तर मुंबई आणि राजस्थानचं टेन्शन वाढलं वाचा काय झाल ते
Follow us
| Updated on: May 13, 2023 | 8:05 PM

मुंबई : आयपीएल 2023 स्पर्धेत लखनऊ सुपर जायंट्सने सनराईजर्स हैदराबाला 7 गडी आणि 4 चेंडू राखून पराभूत केलं.त्यामुळे गुणतालिकेत मोठा उलटफेर झाला असून काही संघांचं टेन्शन वाढलं आहे. या विजयासह लखनऊचा संघ सुपर 4 मध्ये पोहोचला आहे. तर राजस्थान रॉयल्सचं टेन्शन वाढलं आहे. लखनऊमुळे राजस्थानला जबरदस्त फटका बसणार आहे. चेन्नई विरुद्ध लखनऊ हा सामना पावसामुळे रद्द झाला आणि त्याचा थेट फायदा दोन्ही संघांना झाला. प्रत्येकी एक गुण या दोन्ही संघांना मिळाला आहे. त्यामुळे राजस्थानचं गणित फिस्कटलं आहे.

आयपीएल गुणतालिकेत टॉप 4 मध्ये असलेल्या प्रत्येक संघाने प्रत्येकी 12 सामने खेळले असून 2 सामने उरले आहेत. गुजरातचे 16, चेन्नईचे 15, मुंबईचे 14 आणि लखनऊचे 13 गुण आहेत. तर 12 गुणांसह राजस्थान पाचव्या स्थानावर असून दोन सामने उरले आहेत. लखनऊ आणि चेन्नईला प्रत्येकी एक गुण मिळाल्याने राजस्थानचं गणित कठीण झालं आहे.

लखनऊचे दोन सामने मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स सोबत आहेत. त्यापैकी एका सामन्यात काहीही करून लखनऊला पराभूत होणं गरजेचं आहे. कारण लखनऊने दोन्ही सामने जिंकले तर 17 गुण होतील. तर राजस्थानने उर्वरित दोन सामने जिंकले तर 16 गुण होतील. त्यामुळे एका गुणामुळे प्लेऑफची संधी हुकू शकते.

राजस्थान प्रमाणे मुंबईचीही अशीच स्थिती आहे. गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी असले तरी दोन्ही सामने जिंकावे लागतील.मुंबई 14 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. मुंबईचे उर्वरित दोन सामने लखनऊ आणि हैदराबादसोबत आहेत. या दोन सामन्यात विजय मिळवला तर 18 गुण होतील. जर एक सामना गमावला तर 16 वर समाधान मानावं लागेल. त्यामुळे एक सामना गमावला तर चित्र बदलून जाईल. नेट रनरेटच्या जोरावर राजस्थानला संधी मिळू शकते.

दोन्ही संघांचे खेळाडू

लखनऊ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), काइल मेयर्स, कृणाल पांड्या (कर्णधार), प्रेरक मांकड, मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन, अमित मिश्रा, यश ठाकूर, रवी बिश्नोई, युधवीर सिंग चरक, आवेश खान

सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): अभिषेक शर्मा, अनमोलप्रीत सिंग, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम (कर्णधार), हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, अब्दुल समद, टी नटराजन, मयंक मार्कंडे, भुवनेश्वर कुमार, फजलहक फारुकी.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.