Jasprit Bumrah | जसप्रीत बुमराह IPL 2023 मधून ‘आऊट’, पलटणला मोठा झटका

जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे गेल्या अनेक महिन्यांपासून क्रिकेटपासून दूर आहे. बुमराह अनेक मालिकांमध्ये खेळू शकला नाही.

Jasprit Bumrah | जसप्रीत बुमराह IPL 2023 मधून 'आऊट', पलटणला मोठा झटका
Follow us
| Updated on: Feb 28, 2023 | 7:01 PM

मुंबई | क्रिकेट चाहत्यांना आयपीएल 16 व्या मोसमाचे वेध लागले आहे. आयपीएलच्या 16 व्या मोसमाची सुरुवात 31 मार्चपासून होणार आहे. तर साखळी फेरीतील शेवटचा सामना हा 28 मे रोजी पार पडणार आहे. त्याआधी आयपीएलमधील सर्वात यशस्वी असणाऱ्या मुंबई इंडियन्स टीमसाठी वाईट बातमी समोर आली आहे. यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर झाला आहे. त्यामुळे मुंबई टीम मॅनेजमेंटला मोठा झटका लागला आहे.

बुमराहला टी 20 वर्ल्ड कप 2022 च्या आधी पाठदुखीच्या त्रास झाला होता. बुमराह तेव्हापासून दुखापतीतून सावरण्यासाठी एनसीएत मेहनत घेतोय. या दरम्यानच्या काळात बुमराहला आणखी एक दुखापत झाली. त्यामुळे बुमराहचं कमबॅक रखडत गेलं. बुमराह अजून राष्ट्रीय क्रिकेट अकादमी बंगळुरु इथे दुखापतीवर मेहनत घेतोय.

बुमराहला जुलै 2022 मध्ये इंग्लंड दौऱ्यावर असताना पाठदुखीचा त्रास झाला. त्यानंतर बुमराहला अनुक्रमे एशिया कप, टी 20 वर्ल्ड कप, त्यानंतर श्रीलंका विरुद्धच्या मालिकेतही त्याला खेळता आलं नाही. सध्या सुरु असलेल्या बॉर्डर गावसकर ट्रॉफीतही बुमराह नाही. तसेच ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे सीरिजमध्येही बुमराहची दुखापतीमुळे निवड करण्यात आलेली नाही.

हे सुद्धा वाचा

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलला मुकणार?

बुमराहच्या या दुखापतीमुळे तो वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलआधी तरी फीट होणार की नाही, असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे. टीम इंडियाला वर्ल्ड चॅम्पियन होण्यापासून काही पाउल दूर आहे. बुमराहने आतापर्यंत टीम इंडियाला भेदक गोलंदाजीच्या जोरावर विजय मिळवून दिला आहे. त्यामुळे फायनलमध्ये बुमराह असणं टीम इंडियासाठी महत्वाचं आहे. मात्र बुमराह दुखापतीतून तोवर सावरतो की नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

मुंबईची पहिली मॅच केव्हा?

दरम्यान मुंबई या मोसमातील आपला सलामीचा सामना हा बंगळुरु विरुद्ध खेळणार आहे. हा सामना 2 एप्रिलला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरु होणार आहे.

यशस्वी टीम

मुंबई इंडियन्स आयपीएलमधील सर्वात यशस्वी टीम आहे. मुंबईने एकूण 15 मोसमांपैकी 5 वेळा विजेतेपद पटकावलं आहे. मुंबईने 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 अशा एकूण 5 पर्वांमध्ये आयपीएल ट्रॉफी उंचावली आहे. मुंबईच्या गोटात यावेळेस आणखी अनुभवी खेळाडू दाखल झाले आहेत.

मुंबई इंडियन्स टीम | रोहित शर्मा (कॅप्टन), कॅमरुन ग्रीन, झाय रिचर्डसन, पियूष चावला, ड्वेन यानसन, शम्स मुलानी, राघव गोयल, विष्णु विनोद, नेहल वढेरा, टीम डेविड, रमनदीप सिंह, टिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, अरशद खान, कुमार कार्तिकेय, ऋतिक शौकीन, बेहरनडॉर्फ, अर्जुन तेंडुलकर, आकाश मधवाल, इशान किशन, ट्रिस्टन स्टब्स, ब्रेविस, जोफ्रा आर्चर आणि जसप्रीत बुमराह.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.