Arjun Tendulkar : कोलकाताविरूद्ध अर्जुन तेंडुलकरचं पदार्पण, मोठी अपडेट समोर
मुंबई इंडिअन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यामध्ये काही वेळात सामना सुरू होणार आहे. या सामन्याआधी मोठी अपडेट समोर आली आहे.
मुंबई : मुंबई इंडिअन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यामध्ये काही वेळात सामना सुरू होणार आहे. या सामन्याआधी मोठी अपडेट समोर आली आहे. मुंबईचा स्टार गोलंदाज जोफ्रा आर्चर खेळणार नाही. आधीच मुंबईची बॉलिंग प्रभावी नाही आणि त्यामध्ये जोफ्राच्या न खेळण्यामुळे एक पोकळी निर्माण झाली आहे. यामुळे सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरला या मुंबईच्या अंतिम 11 मध्ये खेळण्याची संधी मिळाली आहे. अर्जुन तेंडुलकर गेल्या तीन हंगामांपासून मुंबई इंडियन्सचा भाग आहे. मात्र त्याला आयपीएलमध्ये अद्यापही पदार्पण करण्याची संधी मिळालेली नव्हती.
मुंबईचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर आधीच या सामन्यातून बाहेर पडला आहे. जोफ्रा आर्चर 2 एप्रिल रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध संघाचा पहिला सामना खेळला होता परंतु दुखण्यामुळे तो त्यानंतरच्या सामन्यांमध्ये खेळू शकला नाही. अशा परिस्थितीत मुंबई इंडियन्सच्या संघात जोफ्रा आर्चरच्या जागी अर्जुन तेंडुलकरला संधी मिळाली आहे. अर्षद खान याच्या जागेवर त्याला संघात स्थान देण्यात आलं आहे. तर आज मुंबईचं कर्णधारद सूर्यकुमार यादवकडे देण्यात आलं आहे.
23 वर्षीय अर्जुन तेंडुलकरने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत 7 प्रथम श्रेणी, 7 लिस्ट ए आणि 9 टी-20 सामने खेळले आहेत. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये गोव्यासाठी शतकही ठोकले आहे. अर्जुनने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 12, लिस्ट-A मध्ये 8 आणि T20 मध्ये एकूण 12 विकेट घेतल्या आहेत. त्याच वेळी, त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 223, लिस्ट-ए मध्ये 25 आणि टी-20 मध्ये 20 धावा केल्या आहेत.
रोहित शर्मा (कर्णधार), सूर्यकुमार यादव, कॅमेरून ग्रीन, टीम डेव्हिड, रमणदीप सिंग, टिळक वर्मा, झ्ये रिचर्डसन, पियुष चावला, इशान किशन, ट्रिस्टन स्टब्स, डेवाल्ड ब्रेविस, जोफ्रा आर्चर, जसप्रीत बुमराह, अर्जुन तेंडुलकर, अर्शद खान, कुमार कार्तीय , हृतिक शोकीन, जेसन बेहरेनडॉर्फ, डन्ने जॉन्सन, विष्णू विनोद, शम्स मुलानी, नेहल वढेरा, राघव गोयल, झ्ये रिचर्डसन आणि आकाश मधवाल.