MI vs RCB : कोहली-डुप्लेसीने फक्त 22 बॉलमध्ये तोडलं मुंबई इंडियन्सच मनोबल
MI vs RCB IPL 2023 : विराट कोहली आणि फाफ डुप्लेसीने 22 चेंडूत फिरवला सामना. आरसीबीने या सीजनमध्ये धमाकेदार सुरुवात केली आहे. कोहली आणि डुप्लेसीने रॉयल चॅलेंजर्स बँगलोरच्या विजयाचा पाया रचला.
MI vs RCB IPL 2023 : रॉयल चॅलेंजर्स बँगलोर टीम आणि त्यांच्या फॅन्ससाठी IPL 2023 ची शानदार सुरुवात झाली आहे. अपेक्षा केली होती, तशीच धडाकेबाज सुरुवात RCB ला या सीजनमध्ये मिळाली आहे. तीन वर्षानंतर चिन्नास्वामी स्टेडियमवर आरसीबीची टीम खेळत होती. यंदाच्या सीजनमध्ये मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सलामीच्या सामन्यात त्यांच्या दोन मोठ्या बॅट्समननी जबरदस्त बॅटिंग केली.
मुंबई इंडियन्स विरुद्ध कॅप्टन फाफ डुप्लेसी आणि माजी कर्णधार विराट कोहलीने दमदार अर्धशतक झळकावलं. रविवारी 2 एप्रिलला दोन्ही टीम्सनी यंदाच्या सीजनमधला आपला पहिला सामना खेळला. परंपरेप्रमाणे मुंबई इंडियन्सने पहिला सामना गमावला.
22 चेंडूत तोडलं मनोबल
या मॅचमध्ये कॅप्टन डुप्लेसी आणि कोहलीने 14.5 ओव्हरमध्ये 148 धावांची भागीदारी केली. बँगलोरने या मॅचमध्ये 8 विकेटने दणदणीत विजय मिळवला. दोघांनी शानदार अर्धशतक झळकावली. खरंतर या मॅचमध्ये डुप्लेसी-कोहलीने 22 चेंडूत मुंबई इंडियन्स टीमच मनोबल तोडलं.
या 22 चेंडूत काय घडलं?
त्या दोघांनी या 22 चेंडूत 11 चौकार आणि 11 षटकार लगावले. त्यांनी तब्बल 110 धावा चौकार-षटकारांनी वसूल केल्या. आरसीबीचा कॅप्टन डुप्लेसीने सुरुवातीपासून आक्रमक भूमिका स्वीकाराली. त्याने फक्त 29 चेंडूत हाफ सेंच्युरी झळकवली. डुप्लेसी 15 व्या ओव्हरमध्ये आऊट झाला. पण तो पर्यंत मुंबई इंडियन्सला खूप उशीर झाला होता. सामना पूर्णपणे आरसीबीच्या नियंत्रणात होता. त्याने 43 चेंडूत 73 धावा कुटल्या. यात 5 फोर आणि 6 सिक्स होते.
Couldn’t agree more with you, Skip! It was in fact a run-chase masterclass! ?#PlayBold #ನಮ್ಮRCB #IPL2023 #RCBvMI @faf1307 pic.twitter.com/mg7SnLrvvB
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) April 2, 2023
कोहलीने किती चेंडूत झळकवल अर्धशतक
3 सीजननंतर चिन्नास्वामीवर RCB फॅन्ससमोर खेळणाऱ्या कोहलीने प्रेक्षकांना निराश केलं नाही. RCB च्या माजी कर्णधाराने 38 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. कोहली शेवटपर्यंत क्रीजवर टीकून होता. 17 व्या ओव्हरमध्ये सिक्स मारुन त्याने टीमला विजय मिळवून दिला. कोहलीने 49 चेंडूत नाबाद 82 धावा फटकावल्या. यात 6 फोर आणि 5 सिक्स आहेत. विराट कोहलीचा जोफ्रा आर्चरवर हल्लाबोल
कोहलीने या मॅचमध्ये एक मुख्य काम केलं. त्याने मुंबई इंडियन्सचा प्रमुख गोलंदाज जोफ्रा आर्चरचा प्रभाव कमी केला. त्याच्या गोलंदाजीवर सहज धावा वसूल केल्या. जोफ्रा आर्चरचा दबाव टीमवर येणार नाही, याची काळजी घेतली. कोहलीने आर्चरच्या 17 चेंडूत 28 धावा वसूल केल्या. यात 2 सिक्स आणि 2 फोर आहेत.