IPL 2023 : किंमत फक्त 20 लाख, पण CSK साठी करेल मोठा धमाका, 8 व्या नंबरवर ठोकल्या 241 धावा
IPL 2023 : बॅटच नाही, बॉलने पण कमाल करु शकतो. त्याने याआधी 7 चेंडूत 7 विकेट घेतल्यात. CSK ने टीममधील एका नव्या सहकाऱ्याचा फोटो शेअर केलाय. या फोटोने सगळ्यांच लक्ष वेधून घेतलय.
IPL 2023 : आयपीएल 2023 च काऊंटडाऊन सुरु झालय. सर्वच टीम्स तयारीमध्ये व्यस्त आहेत. आयपीएलमधील दुसरी यशस्वी टीम चेन्नई सुपर किंग्सने सुद्धा जोर लावलाय. एमएस धोनी नेट्समध्ये मेहनत घेतोय. टीममधील त्याचे युवा सहकारी सुद्धा मेहनत, कष्ट घेण्यात मागे नाहीयत. फ्रेंचायजी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येक तयारीची अपडेट फॅन्सपर्यंत पोहोचवतेय. CSK ने टीममधील एका नव्या सहकाऱ्याचा फोटो शेअर केलाय. या फोटोने सगळ्यांच लक्ष वेधून घेतलय.
सीएसकेच्या या खेळाडूच्या हातावर एक परमनंट घड्याळ फिक्स आहे. 241 धावा केल्यानंतर त्याच्या हातावर हे परमनंट घड्याळ आलं. या प्लेयरच नाव आहे, अजय मंडल. त्याने 3 वर्षांपूर्वी 8 व्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन 241 धावा ठोकल्या होत्या. रणजी ट्रॉफीमध्ये त्याने ही करामत केली होती.
शरीरावर इतके सर्व टॅटू का?
भारतीय क्रिकेटमध्ये अजयच्या त्या इनिंगने खळबळ उडवून दिली होती. या तुफानी बॅटिंग नंतर त्याच्या हातावर एक परमनंट घड्याळ आलं. अजयने स्वत:ला मोटिवेट करण्यासाठी शरीरावर अनेक टॅटू बनवलेत. यात घड्याळाचा एक टॅटू आहे. एका खास उद्देशाने त्याने शरीरावर हे टॅटू काढलेत. परिस्थिती कठीण असेल, त्यावेळी संयम ठेवला पाहिजे, टॅटमधून ही गोष्ट माझ्या लक्षात येते. अजयने म्हणूनच हातावर घड्याळाचा टॅटू बनवलाय.
View this post on Instagram
बॉलिंगमध्ये केली अशी कमाल
प्रत्येकाची वेळ बदलते. अजयची सुद्धा तशीच वेळ बदलली. त्याने बॅटची ताकत आधीच दाखवली होती. आता त्याने चेंडूने कमाल केली. मागच्यावर्षी डिसेंबर महिन्यात अजयने रणजी ट्रॉफीमध्ये छत्तीसगडकडून खेळताना पुडुचेरी विरोधात 7 रन्सवर 7 विकेट घेतले. आयपीएल मिनी ऑक्शनआधी त्याने ही कामगिरी केली. त्यामुळे लिलावात त्याला खरेदीदार मिळाला. चेन्नई सुपर किंग्सने 20 लाख रुपये मोजून अजय मंडलला विकत घेतलं. आयपीएलमध्ये हा प्लेयर मोठी कमाल करु शकतो.