Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Indians च्या टीममध्ये पोलार्ड, पंड्यापेक्षा धोकादायक खेळाडूची एंट्री, जिंकवून देईल 6 वी IPL ट्रॉफी

IPL 2021 : कायरन पोलार्डने IPL मधून निवृत्ती घेतलीय. हार्दिक पंड्या 2021 पर्यंत मुंबई इंडियन्स टीमचा प्राण होता. आता नव्या सीजनमध्ये एक नवीन धमाकेदार खेळाडू मुंबईच्या टीममध्ये एंट्री करणार आहे.

Mumbai Indians च्या टीममध्ये पोलार्ड, पंड्यापेक्षा धोकादायक खेळाडूची एंट्री, जिंकवून देईल 6 वी IPL ट्रॉफी
Pollard-hardik
Follow us
| Updated on: Mar 14, 2023 | 12:35 PM

IPL 2023 News : कायरन पोलार्डने आयपीएलमधून निवृत्ती जाहीर केलीय. हार्दिक पंड्या आयपीएल 2021 पर्यत मुंबई इंडियन्सचा प्राण होता. आता तो गुजरात टायटन्सचा कॅप्टन आहे. हे दोन खेळाडू नसल्याने मुंबई इंडियन्सची फलंजाजी थोडी कमकुवत झालीय. अशावेळी एक स्फोटक फलंदाज मुंबई इंडियन्सच्या टीमचा ताकत वाढवू शकतो. त्याने सरस खेळ दाखवला, तर मुंबई इंडियन्ससाठी IPL 2023 ची ट्रॉफी जिंकणं कठीण काम नसेल.

मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये एका धोकादायक खेळाडूची एंट्री झाली आहे. तो कायरन पोलार्ड आणि हार्दिक पंड्यापेक्षा पण धोकादायक आहे. त्याच्या समावेशामुळे मुंबई इंडियन्स सहाव्यांदा आयपीएलच जेतेपद पटकावण्याची शक्यता कैकपटीने वाढली आहे.

कशासाठी ओळखला जातो?

मुंबई इंडियन्सने आयपीएल 2023 च्या सीजनसाठी ऑलराऊंडर कॅमरुन ग्रीनला विकत घेतलय. त्यासाठी मुंबई इंडियन्सने 17.25 कोटी रुपये मोजलेत. ऑस्ट्रेलियन ऑलराऊंडर ग्रीन आयपीएलच्या इतिहासातील विक्री झालेला दुसरा महागडा खेळाडू आहे. स्फोटक बॅटिंग आणि घातक गोलंदाजीसाठी कॅमरुन ग्रीन प्रसिद्ध आहे. सप्टेंबर 2022 मध्ये ऑस्ट्रेलियाची टीम तीन सामन्यांची T20 सीरीज खेळण्यासाठी भारत दौऱ्यावर आली होती. त्यावेळी कॅमरुन ग्रीनने आपल्या स्फोटक बॅटिंगची प्रचिती दिली होती.

भारताता त्याचा परफॉर्मन्स कसा आहे?

भारतात मागच्यावर्षी ऑस्ट्रेलियन टीमने 20 सप्टेंबर 2022 रोजी पहिला टी 20 सामना खेळला. त्या मॅचमध्ये कॅमरुन ग्रीनने 30 चेंडूत 61 धावा फटकावल्या. यात 8 चौकार आणि 4 षटकार होते. या मॅचमध्ये ग्रीनने एक विकेटही काढला. 25 सप्टेंबरला हैदराबादला झालेल्या तिसऱ्या टी 20 सामन्यात 21 चेंडूत 52 धावा फटकावल्या. यात 7 चौकार आणि 3 षटकार होते.

भारतीय पीचेसवर ग्रीनच रौद्र रुप पाहिल्यानंतर सर्वच आयपीएल टीम्समध्ये ग्रीनला विकत घेण्यासाठी चढाओढ लागली होती. मुंबई इंडियन्सने मिनी ऑक्शनमध्ये बाजी मारली. त्यांनी 17.25 कोटी रुपये मोजून ग्रीनला विकत घेतलं. IPL 2023 चे टॉप 3 महागडे खेळाडू

सॅम कुरेन (इंग्लंड) – 18.50 कोटी, पंजाब किंग्स

कॅमरून ग्रीन (ऑस्ट्रेलिया) – 17.50 कोटी, मुंबई इंडियन्स

बेन स्टोक्स (इंग्लंड) – 16.25 कोटी, चेन्नई सुपर किंग्स

कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा.
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं.
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली.
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल.
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना.
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया.