6,6,6 : मुंबई इंडिअन्स संघाने थरारक सामन्यात मिळवला विजय, जयस्वालचं शतक व्यर्थ!
शेवटच्या ओव्हरमध्ये सलग तीन सिक्स मारत संघाला विजय मिळवून दिला. राजस्थान रॉयल्सच्या 213 धावांचं लक्ष्य मुंबई इंडिअन्सने 3 चेंडू राखून पूर्ण केलं आहे.
मुंंबई : मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यामधील सामन्यात मुंबईने विजय मिळवला आहे. या सामन्याचा खरा हिरो ठरला तो टीम डेविड. शेवटच्या ओव्हरमध्ये सलग तीन सिक्स मारत संघाला विजय मिळवून दिला. राजस्थान रॉयल्सचं 213 धावांचं लक्ष्य मुंबई इंडिअन्सने 3 चेंडू आणि सहा विकेट्स राखून पूर्ण केलं आहे. आयपीएलच्या 1000 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सचा 6विकेट्सने पराभव केला. या विजयासह मुंबई संघाने कर्णधार रोहितला वाढदिवसादिवशी विजयाची भेट दिली आहे.
मुंबई इंडिअन्सचे इशान किशन 28 धावा, कॅमेरॉन ग्रीन 44 धावा, सूर्यकुमार यादव 55 धावा, तिलक वर्मा 29 धावा आणि टिम डेविडची 45 धावा यांच्या आक्रमक खेळीच्या जोरावर मुंबईने हा विजय साकारला. हातातोंडाशी असलेला विजयाचा घास डेविडने हिसकावून घेतला आहे. युवा जयस्वालची शतकी खेळी वाया गेली असली तरी पठ्ठ्याने सर्वांची मने जिंकली आहेत.
आजच्या सामन्यामध्ये मुंबईची खरी ताकद दिसून आली. मुंबईची गोलंदाजी ढिसार असली तर फलंदाजी कमाल आहे. मात्र खराब फॉर्ममुळे पराभवाचा सामना करावा लागत होता. त्रिमुर्तींनी केलेल्या खेळीच्या जोरावर मुंबईने विजय साकारला आहे.
राजस्थानकडून यशस्वी जयस्वालने सर्वाधिक 124 धावा केल्या. मात्र त्याच्याशिवाय इतर कोणत्याही फलंदाजाला विशेष काही करता आलं नाही. जोस बटलरने 18 धावा केल्या. या दोघांशिवाय केवळ संजू सॅमसन (14 धावा) आणि जेसन होल्डर (11 धावा) करून बाद झाले होते.
दोन्ही संघांची प्लेइंग 11
यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (w/c), देवदत्त पडिककल, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, जेसन होल्डर, ट्रेंट बोल्ट, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल
रोहित शर्मा (C), इशान किशन (W), कॅमेरॉन ग्रीन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टिम डेव्हिड, जोफ्रा आर्चर, पीयूष चावला, कुमार कार्तिकेय, रिले मेरेडिथ, अर्शद खान