IPL 2023 MI vs SRH Live Streaming | मुंबई विरुद्ध हैदराबाद आमनेसामने, पलटणसाठी अस्तित्वाचा सामना
Mumbai Indians vs Sunrisers Hyderabad Live Streaming | मुंबई इंडियन्स आयपीएल 16 व्या मोसमातील साखळी फेरीतील शेवटचा सामना हा सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध खेळणार आहे.
मुंबई | आयपीएल 16 व्या मोसमातील 69 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद आमनेसामने असणार आहेत. हा सामना 21 मे रोजी खेळवण्यात येणार आहे. मुंबई आणि हैदराबादची या मोसमात आमनेसामने येण्याची ही दुसरी वेळ असणार आहे. मुंबईने या मोसमात 18 एप्रिल रोजी हैदराबादवर 14 धावांनी विजय मिळवला होता. मुंबईला प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात विजय मिळवावा लागणार आहे. तर हैदराबादचं आव्हान संपुष्टात आलं आहे. त्यामुळे हैदराबादला कसलंच टेन्शन नाही. मात्र हैदराबाद हा सामना जिंकून मागील सामन्यातील पराभवाचा वचपा घेऊ शकते. त्यामुळे मुंबईचा गेम बिघडू शकतो. दरम्यान या सामन्याबाबत आपण सविस्तर जाणून घेऊयात.
मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद सामना कधी?
मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद यांच्यातील सामना हा रविवारी 21 मे रोजी खेळवण्यात येणार आहे.
सामन्याचं आयोजन कुठे?
मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद यांच्यातील सामन्याचं आयोजन हे मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे.
सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद यांच्यातील सामन्याला दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 3 वाजता टॉस होणार आहे.
लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहता येणार?
मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद यांच्यातील सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येईल.
डिजीटल स्ट्रीमिंगचं काय?
मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद यांच्यातील सामना जिओ एपच्या मदतीने मोबाईल आणि लॅपटॉपवर पाहता येईल. तसेच टीव्ही 9 मराठी वेबसाईटवर तुम्हाला सामन्याबाबत सविस्तर माहितीही जाणून घेता येईल.
सनरायझर्स हैदराबाद टीम | एडन मार्कराम (कर्णधार), हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, हॅरी ब्रूक, ग्लेन फिलिप्स, अब्दुल समद, कार्तिक त्यागी, मयंक डागर, भुवनेश्वर कुमार, नितीश रेड्डी, टी नटराजन, मयंक मार्कंडे, विव्रत शर्मा, मयंक अग्रवाल, सनवीर सिंग, अकेल होसेन, मार्को जानसेन, फजलहक फारुकी, आदिल रशीद, अनमोलप्रीत सिंग, उमरान मलिक, उपेंद्र यादव आणि समर्थ व्यास.
मुंबई इंडियन्स टीम | संघ रोहित शर्मा (कॅप्टन), इशान किशन (विकेटकीपर), कॅमेरॉन ग्रीन, सूर्यकुमार यादव, नेहल वढेरा, टीम डेव्हिड, हृतिक शोकीन, ख्रिस जॉर्डन, पीयूष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ, आकाश मधवाल, विष्णू विनोद, कुमार कार्तिकेय, रमणदीप सिंग, ट्रिस्टन स्टब्स, राघव गोयल, अर्शद खान, डेवाल्ड ब्रेविस, अर्जुन तेंडुलकर, रिले मेरेडिथ, शम्स मुलानी, टिळक वर्मा, डुआन जॅनसेन आणि संदीप वॉरियर.