IPL 2023 Orange and Purple Cap | पंजाब आणि लखनऊचा विजय, ऑरेन्ज आणि पर्पल कॅपच्या शर्यतीत कोण आघाडीवर?

IPL 2023 Orange Cap and Purple Cap | क्रिकेट चाहत्यांना शनिवारी डबल हेडरचा थरार पाहायला मिळाला. शनिवारपासून क्वार्टर फायनल राउंड सुरु झाल्याने आता चुरस आणखी वाढणार आहे. पाहा ऑरेन्ज आणि पर्पल कॅप कुणाकडे?

IPL 2023 Orange and Purple Cap | पंजाब आणि लखनऊचा विजय, ऑरेन्ज आणि पर्पल कॅपच्या शर्यतीत कोण आघाडीवर?
Follow us
| Updated on: May 14, 2023 | 12:08 AM

मुंबई | आयपीएल 16 व्या मोसमात शनिवारी 13 मे रोजी 2 सामने पार पडले. या डबल हेडरमधील पहिल्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने सनरायजर्स हैदराबादवर 7 विकेट्सने शानदार विजय मिळवला. तर त्यानंतर दुसऱ्या सामन्यात पंजाब किंग्सने दिल्ली कॅपिट्ल्सला 31 धावांनी पराभूत केलं. या 2 सामन्यांमध्ये गोलंदाजांची धुलाई पाहायला मिळाली. विजयी धावांचा पाठलाग करताना लखनऊकडून मार्क्स स्टोयनिस, प्रेरक मंकड आणि निकोलस पूरन या तिकडीने विस्फोटक खेळी केली. तर पंजाबच्या प्रभासिमरन सिंह याने दिल्ली विरुद्ध शतक ठोकलं.

पहिल्या सामन्यात लखनऊ आणि दुसऱ्या मॅचमध्ये पंजाब या दोन्ही संघांनी विजय मिळवून प्लेऑफच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकलं आहे. या दोन्ही सामन्यांनंतर ऑरेन्ज आणि पर्पल कॅपच्या पहिल्या 5 खेळाडूंमध्ये बदल झालाय का, हे आपण पाहणार आहोत.

या डबल हेडरनंतरही शनिवारी ऑरेन्ज आणि पर्पल कॅपमध्ये कोणताही बदल झालेला नाही. ऑरेन्ज आणि पर्पल कॅपमधील पहिले 5 खेळाडू आपल्या ठिकाणी कायम आहेत. त्यामुळे फाफ डु प्लेसीस याच्याकडे ऑरेन्ज आणि राशिद खान याच्याकडे पर्पल कॅप कायम आहे.  मात्र रविवारी 14 मे रोजी होणाऱ्या डबल हेडरनंतर यामध्ये नक्कीच बदल होणार आहे. कारण रविवारी मोठ्या संघांमध्ये कडवी टक्कर होणार आहे.

ऑरेन्ज कॅप कुणाकडे?

टीमचं नाव फलंदाजाचं नाव एकूण सामनेएकूण धावाहायस्कोअर
गुजरात टायटन्स शुबमन गिल17890 129
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुफाफ डु प्लेसिस 1473084
चेन्नई सुपर किंग्स डेव्हॉन कॉनव्हे16 672 92*
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विराट कोहली14639101*
राजस्थान रॉयल्सयशस्वी जयस्वाल14625 124

रविवारी आयपीएल 16 व्या मोसमात पहिला सामना हा आरसीबी विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात होणार आहे. तर दुसऱ्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स आमनेसामने असणार आहेत.

पर्पल कॅप कुणाच्या डोक्यावर?

टीमचं नावगोलंदाजाचं नाव एकूण सामने एकूण विकेट्स सर्वोत्तम कामगिरी
गुजरात टायटन्समोहम्मद शमी172811/4
गुजरात टायटन्समोहित शर्मा142710/5
गुजरात टायटन्सराशिद खान 172730/4
मुंबई इंडियन्स पीयूष चावला16 22 22/3
राजस्थान रॉयल्स युझवेंद्र चहल142117/4

ऑरेन्ज कॅपमधील पहिल्या 5 फंलदाजांमध्ये आरसीबीचा कर्णधार फाफ डु प्लेसीस, राजस्थान रॉयल्सचा यशस्वी जयस्वाल आणि सीएसकेचा डेव्हॉन कॉनवे यांचा समावेश आहे. तर पर्पल कॅपच्या लढतीत असलेल्या पहिल्या 5 गोलंदाजांमध्ये राजस्थान रॉयल्सचा युझवेंद्र चहल आणि चेन्नई सुपर किंग्सचा तुषार देशपांडे आहे. या टीम रविवारी खेळणार आहेत.

त्यामुळे निश्चितच पर्पल आणि ऑरेन्ज कॅपच्या शर्यतीत बदल होणं अपेक्षित आहे. यामुळे रविवारी नक्की काय होतं, कोण उलटफेर करतं, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

पंजाब किंग्स प्लेइंग इलेव्हन | शिखर धवन (कॅप्टन), प्रभसिमरन सिंग, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), सॅम कुरान, सिकंदर रझा, शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, ऋषी धवन, राहुल चहर आणि अर्शदीप सिंग.

दिल्ली कॅपिट्ल्स प्लेइंग इलेव्हन | डेव्हिड वॉर्नर (कॅप्टन), फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), मिचेल मार्श, रिली रोसो, अमन हकीम खान, अक्षर पटेल, प्रवीण दुबे, कुलदीप यादव, इशांत शर्मा, खलील अहमद आणि मुकेश कुमार.

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.