मुंबई : आयपीएल 2023 स्पर्धेतील प्लेऑफच्या महत्त्वपूर्ण सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्सचा पराभव केला. दिल्लीने पंजाब किंग्सला विजयासाठी 213 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र पंजाबचा संघ 8 गडी गमवून 198 धावा करू शकला. या पराभवामुळे पंजाबचं प्लेऑफचं स्वप्न भंगलं. पंजाबचा शेवटचा सामना राजस्थान रॉयल्ससोबत आहे. मात्र हा सामना फक्त औपचारिकता असणार आहे. कारण राजस्थानचंही प्लेऑफचं आव्हान जवळपास संपुष्टात आलं आहे.
ऑरेन्ज कॅप आरसीबीचा कर्णधार फाफ डु प्लेसीस याच्याकडेच कायम आहे. फाफने या ऑरेन्ज कॅपवर घट्ट पकड मिळवली आहे. ऑरेन्ज कॅपच्या शर्यतीतील पहिल्या 5 फलंदाजांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. मुंबईचा सूर्यकुमार हा पाचव्या क्रमांकावरच कायम आहे.
सूर्याला लखनऊ विरुद्ध मोठी खेळी करत वरच्या क्रमांकावर येण्याची संधी होती. मात्र सूर्याला अपयशी ठरला. सूर्या अवघ्या 7 धावा करून आऊट झाला. त्यामुळे सूर्या ऑरेन्ज कॅपच्या शर्यतीत आहे तिथेच अर्थात पाचव्या क्रमांकावर राहिला. सूर्याने आणखी काही धावा केल्या असत्या तर, सामन्याचा निकाल निश्चित वेगळा असता. मात्र यासाठी सूर्या एकटा जबाबदार नाही. मुंबईच्या इतर फलंदाजांनीही थोडी जबाबदारी घेतली असती, तर हा विजय सोपा होऊ शकला असता.
टीमचं नाव | फलंदाजाचं नाव | एकूण सामने | एकूण धावा | हायस्कोअर |
---|---|---|---|---|
गुजरात टायटन्स | शुबमन गिल | 17 | 890 | 129 |
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु | फाफ डु प्लेसिस | 14 | 730 | 84 |
चेन्नई सुपर किंग्स | डेव्हॉन कॉनव्हे | 16 | 672 | 92* |
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु | विराट कोहली | 14 | 639 | 101* |
राजस्थान रॉयल्स | यशस्वी जयस्वाल | 14 | 625 | 124 |
दरम्यान पर्पल कॅपही मोहम्मद शमी याच्याकडे कायम आहे. इथेही ऑरेन्ज प्रमाणे पर्पल कॅपमध्ये बदल झालेला नाही. पहिले 5 बॉलर कायम आहेत. या मध्ये मुंबई इंडियन्सच्या पीयूष चावला याचा समावेश आहे. चावलाला अधिक विकेट्स घेऊन चौथ्यावरुन किमान तिसऱ्या स्थानी येण्याची संधी होती. मात्र चावलाला ते शक्य झालं नाही. पण चावलाने त्याचं चौथं स्थान कायम ठेवलं.
टीमचं नाव | गोलंदाजाचं नाव | एकूण सामने | एकूण विकेट्स | सर्वोत्तम कामगिरी |
गुजरात टायटन्स | मोहम्मद शमी | 17 | 28 | 11/4 |
गुजरात टायटन्स | मोहित शर्मा | 14 | 27 | 10/5 |
गुजरात टायटन्स | राशिद खान | 17 | 27 | 30/4 |
मुंबई इंडियन्स | पीयूष चावला | 16 | 22 | 22/3 |
राजस्थान रॉयल्स | युझवेंद्र चहल | 14 | 21 | 17/4 |
पंजाब किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): शिखर धवन (कर्णधार), अथर्व तायडे, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), सॅम करन, शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, राहुल चहर, कागिसो रबाडा, नॅथन एलिस, अर्शदीप सिंग
दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), पृथ्वी शॉ, फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), रिली रोसो, अक्षर पटेल, अमन हकीम खान, यश धुल, कुलदीप यादव, एनरिक नॉर्टजे, इशांत शर्मा, खलील अहमद