Hardik Pandya | हार्दिक पंड्या याने सिनिअर खेळाडूंना शिव्या घातल्या?
हार्दिक पंड्या याने आतापर्यंत अनेकदा क्रिकेटच्या मैदानात आपल्या सहकाऱ्यांना दिलेली वागणूक सर्वांनी पाहिलीय. हार्दिकने आता पुन्हा एकदा नेटकऱ्यांचा रोष ओढून घेतला आहे. हार्दिकने असं नक्की काय केलं?
मोहाली | आयपीएल 16 व्या हंगामाचा थरार सुरु आहे. आतापर्यंत एकूण 18 सामन्यांचं यशस्वी आयोजन पार पडलंय. दिवसेंदिवस स्पर्धेत रंगत येत आहे. आतापर्यंत या मोसमात एकूण 3 सामन्यांचा निकाल हे अखेरच्या बॉलवर लागला आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना या मोसमाच्या सुरुवातीच्या टप्प्यातच थरारक सामने पाहायला मिळाले आहेत. मात्र या स्पर्धेत एक गोष्ट सातत्याने पाहायला मिळतेय ते म्हणजे गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या याचा स्वभाव.
हार्दिक पंड्या याने काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये विराट कोहली याच्याकडे दुर्लक्ष केलं. त्यानंतर आयपीएल 16 व्या मोसमातील उद्धटान समारंभादरम्यान थेट सीसएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्यासोबत हस्तांदोलन करणं टाळलं. हार्दिक पंड्या याची ही कृती क्रिकेट चाहत्यांच्या डोक्यात गेलीच होती. पंड्याला कर्णधार झाल्याचा माज आहे, तो स्वत:ला काय समजतो, अशा शब्दात नेटकऱ्यांनी आपला राग व्यक्त केला होता. हार्दिक पंड्या याच्यावरचा रोष संपतो ना संपतो तेवढ्यात त्याने आणखी एक चिड आणणारी कृती केली आहे.
नक्की काय झालं?
आयपीएलच्या 16 व्या मोसमातील 18 वा सामना हा पंजाब किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात गुजरातने टॉस जिंकून पंजाबला बॅटिंगसाठी भाग पाडलं. गुजरातने पंजाबला 153 धावांवरत रोखलं. मात्र या दरम्यान कॅप्टन हार्दिक आपल्या एका गोलंदाजावर नाराज झालेला दिसून आला. पंजाबच्या बॅटिंग दरम्यान 20 व्या ओव्हरमध्ये जोशुआ लिटल बॉलिंग करत होता. या ओव्हरच्या सुरुवातीआधीच गुजरातने 20 ओव्हर पूर्ण करणं अपेक्षित होतं. मात्र तसं झालं नाही.या दरम्यान शेवटच्या ओव्हरमधील दुसऱ्या चेंडूआधी मोहित शर्मा अपेक्षित ठिकाणी उभा नव्हता.
हार्दिक पंड्या संतापला
— Cricbaaz (@cricbaaz21) April 13, 2023
त्यामुळे हार्दिकचा पारा चढला. हार्दिक मोहित शर्मा याच्यावर संतापला. हार्दिकने इशाऱ्याने मोहितला वेळेचं भान राखा असं म्हटलं. हार्दिकने या दरम्यान शिवीगाळ केल्याचा आरोपही करण्यात येत आहे. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यातही कैद झाला आहे. हार्दिक मोहितवर संतापल्याचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
पंजाब किंग्स प्लेइंग इलेव्हन | शिखर धवन (कॅप्टन), प्रभसिमरन सिंग, मॅथ्यू शॉर्ट, भानुका राजपक्षे, जितेश शर्मा (विकेटकीपर), सॅम कुरान, शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, कागिसो रबाडा, ऋषी धवन आणि अर्शदीप सिंग.
गुजरात टायटन्स प्लेइंग इलेव्हन | हार्दिक पंड्या (कर्णधार), वृद्धिमान साहा (विकेटकीपर), शुबमन गिल, साई सुधारसन, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, अल्झारी जोसेफ, मोहम्मद शमी, मोहित शर्मा आणि जोशुआ लिटल.