PBKS vs MI : 6,6,6 : मुंबईचा इंडिअन्स स्ट्राईक बॉलर आर्चरला निबार झोडलं, सलग 3 सिक्सर, व्हिडीओ व्हायरल!
मुंबईचा स्ट्राईक बॉलर असलेल्या जोफ्रा आर्चर यानेच एकट्याने आपल्या स्पेलमध्ये 56 धावा दिल्या आहेत. इतंकच नाहीतर आर्चरला पंजाबच्या फलंदाजाने एकाच ओव्हरमध्ये सलग 3 सिक्सर मारले आहेत.
मुंबई : पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडिअन्स यांच्यात सुरू असलेल्या सामन्यामध्ये आजची मुंबईच्या गोलंदांजानी गचाळ कामगिरी केली. मुंबईला विरूद्ध संघाने सलग चौथ्या सामन्यात 200 पेक्षा जास्त धावा ठोकल्या आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबईचा स्ट्राईक बॉलर असलेल्या जोफ्रा आर्चर यानेच एकट्याने आपल्या स्पेलमध्ये 56 धावा दिल्या आहेत. इतंकच नाहीतर आर्चरला पंजाबच्या फलंदाजाने एकाच ओव्हरमध्ये सलग 3 सिक्सर मारले आहेत.
पाहा व्हिडीओ-
Livingstone smashing Jofra Archer for Hattrick of Sixes.?#PBKSvsMI #PBKSvsMIpic.twitter.com/xxvD26hYCv
— Cricpedia. (@_Cricpedia) May 3, 2023
19 व्या ओव्हरमध्ये जोफ्रा आर्चर याच्या पहिल्या तीन चेंडूंवर सलग 3 सिक्स मारले. पंजाबचा फलंदाज लियाम लिव्हिंगस्टन स्ट्राईकला होता. पहिल्या तिन्ही चेंडूंवर त्याने सिक्स मारत संघाला 200 धावांचा पल्ला पार करण्यात महत्त्वाची भूमिका निभावली.
पंजाबची बॅटींग-
पंजाब संघाने निर्धारित 20 षटकात 3 गडी गमावत 214 धावा केल्या आहेत. मुंबईला हा सामना जिंकण्यासाठी 215 धावाचं लक्ष्य पूर्ण करायचं आहे. पंजाबकडून लियाम लिव्हिंगस्टनने नाबाद 82 धावा केल्या. यामध्ये त्याने 4 षटकार आणि 7 चौकार मारले. जितेश शर्माने 49 धावांची नाबाद खेळी खेळी केली, त्यानेही 2 षटकार आणि 5 चौकार मारले.
पंजाब किंग्स (प्लेइंग इलेव्हन): प्रभसिमरन सिंग, शिखर धवन (C), मॅथ्यू शॉर्ट, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (w), सॅम कुरान, शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, ऋषी धवन, राहुल चहर, अर्शदीप सिंग
मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (C), इशान किशन (डब्ल्यू), कॅमेरॉन ग्रीन, टिळक वर्मा, टीम डेव्हिड, नेहल वढेरा, जोफ्रा आर्चर, पीयूष चावला, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल, अर्शद खान