IPL 2023 Playoff : हरलेल्या खेळाडूंच्या हाती 3 टीम्सच नशीब, 4 दिवसात क्लियर होईल प्लेऑफचा सीन

IPL 2023 Playoff : फक्त 4 दिवस थांबा, कुठले आहेत ते चार दिवस?. आता प्रत्येक जय-पराजयामुळे प्लेऑफची चुरस वाढत जाणार आहे. गुजरात टायटन्स ही प्लेऑफमध्ये दाखल झालेली पहिली टीम आहे. आता चुरल उर्वरित तीन टीम्समध्ये आहे.

IPL 2023 Playoff  : हरलेल्या खेळाडूंच्या हाती 3 टीम्सच नशीब, 4 दिवसात क्लियर होईल प्लेऑफचा सीन
IPL 2023 playoff ScenarioImage Credit source: PTI
Follow us
| Updated on: May 18, 2023 | 7:58 AM

नवी दिल्ली : IPL 2023 मध्ये पुढचे चार दिवस खूप महत्वाचे आहेत. या चार दिवसात प्लेऑफचा सीन क्लियर होईल. धोनी, विराट आणि रोहित पुढे जाणार की, कोणी प्लेऑफच्या शर्यतीत मागे पडणार? ते चित्र या चार दिवसात स्पष्ट होईल. या चार दिवसात तीन टीम्सची नशीब हरलेले खेळाडू ठरवतील. काल म्हणजे 17 मे पासून याची सुरुवात झाली आहे.

आता तुम्ही विचार करत असाल, हरलेल्या खेळाडूंचा तीन टीम्सच्या नशिबाची काय संबंध? सर्वप्रथम तुम्ही हे लक्षात घ्या, हरलेल्या खेळाडूंचा अर्थ इथे प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर गेलेल्या दोन टीम्सशी आहे. दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायजर्स हैदराबाद हे ते दोन संघ आहेत.

हरलेले खेळाडू ठरवणार 3 टीम्सच नशीब

आता या हरलेल्या दोन टीम्स प्लेऑफच्या शर्यतीत असलेल्या तीन टीम्सचं नशीब ठरवतील. यात एक रॉयल चॅलेंजर्स बँगलोर, दुसरी चेन्नई सुपर किंग्स आणि तिसरी मुंबई इंडियन्स आहे. या तिन्ही टीम्सना आता उर्वरित सामन्यांपेकी एक सामना दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध खेळायच आहे.

RCB समोर SRH च आव्हान

IPL 2023 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बँगलोर टीमचे ग्रुप स्टेजमधील 2 सामने बाकी आहेत. प्लेऑफमध्ये जाण्यासाठी त्यांना दोन मॅच जिंकाव्याच लागतील. त्यांचा पुढचा सामना सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध आहे. काही तासांनी हैदराबादमध्ये हा सामना होईल. हा सामना प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर गेलेल्या SRH ने जिंकला, तर प्लेऑफमध्ये दाखल होण्याच्या RCB च्या मार्गात अडथळे निर्माण होतील.

CSK समोर DC च चॅलेंज

एमएस धोनीची टीम चेन्नई सुपर किंग्ससमोर दिल्ली कॅपिटल्सच आव्हान असेल. दिल्ली कॅपिटल्सची टीम प्लेऑफच्या शर्यतीतून सर्वप्रथम बाहेर गेली. IPL 2023 च्या सीजनचा शेवट विजयाने करण्याचा दिल्लीचा प्रयत्न असेल. CSK ला प्लेऑफची ट्रेन पकडण्यासाठी दिल्लीवर विजय आवश्यक आहे. दोन्ही टीम्सचे आपआपले उद्देश आहेत. यश कोणाला मिळणार? हे 20 मे रोजी ठरेल. मुंबई इंडियन्सकडे शेवटची संधी

विराट आणि धोनी नंतर रोहित शर्माची टीम मुंबई इंडियन्स सुद्धा प्लेऑफच्या शर्यतीत आहे. लखनऊ विरुद्ध सामना गमावल्यामुळे मुंबई इंडियन्सच प्लेऑफच समीकरण बिघडलं आहे. आता आणखी काही गोष्टी बिघडू नयेत, यासाठी मुंबई इंडियन्सला काहीही करुन सनरायजर्स हैदराबादवर विजय मिळवावा लागेल. 21 मे रोजी हा सामना होणार आहे.

Non Stop LIVE Update
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम.
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?.
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा.
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....