IPL 2023 Qualifier 2 GT vs MI Dream 11 : गुजरात विरुद्ध मुंबई सामन्यात हे खेळाडू ठरतील बेस्ट, वाचा ड्रीम इलेव्हन
GT vs MI Dream 11 : आयपीएल 2023 स्पर्धेत अंतिम फेरीच्या दुसऱ्या संघासाठी मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना होणार आहे. या सामन्यात काही खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष असणार आहे.

मुंबई : आयपीएल 2023 स्पर्धेच्याा अंतिम फेरीत चेन्नई सुपर किंग्सने धडक मारली आहे. आता दुसऱ्या संघासाठी मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात सामना होणार आहे. या सामन्यातील विजयी संघ अंतिम फेरीत चेन्नई सुपर किंग्सशी लढणार आहे. त्यामुळे या सामन्यात विजयासाठी खेळाडूंना जबरदस्त कामगिरी करावी लागणार आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. ही खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल मानली जाते. त्याचबरोबर फिरकीपटूंनाही या मैदानात चांगली साथ मिळते. त्यामुळे नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला जाईल.
गुजरात आणि मुंबई या स्पर्धेत तिसऱ्यांदा आमनेसामने येणार आहेत. साखळी फेरीत पहिल्यांदा मुंबई आणि गुजरात यांच्यातील सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये झाला होता. यात मुंबईने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजी घेतली होती. गुजरातने 20 षटकात 6 गडी गमवून 207 धावा केल्या होत्या. पण मुंबईचा संघ 20 षटकात 9 गडी गमवून 152 धावा करू शकला. मुंबईचा 55 धावांनी पराभव झाला होता.
गुजरात विरुद्ध मुंबई यांच्या दुसरा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झाला होता. या सामन्यात गुजरातने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. या सामन्यात मुंबईने 20 षटकात 5 गडी गमवून 218 धावा केल्या होत्या. गुजरातचा संघ 20 षटकात 8 गडी गमवून 191 धावा करू शकला. मुंबईने गुजरातला 27 धावांनी पराभूत केले होते.
मुंबई आणि गुजरातची ड्रीम इलेव्हन
- विकेटकीपर : वृद्धिमान साहा, इशान किशन
- फलंदाज : सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), शुभमन गिल (कर्णधार), डेविड मिलर, नेहल वढेरा
- अष्टपैलू खेळाडू : हार्दिक पांड्या, कॅमरून ग्रीन
- गोलंदाज : पियुष चावला, मोहम्मद शमी, राशीद खान
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), कॅमरून ग्रीन, सूर्यकुमार यादव, नेहल वढेरा, टिम डेविड, ख्रिस जॉर्डन, पियुष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ, कुमार कार्तिकेय, आकाश मढवाल
गुजरात टायटन्स : हार्दिक पांड्या (कर्णधार), वृद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, विजय शंकर, डेविड मिलर, अभिनव मनोहर, राहुल तेवतिया, राशिद खान, मोहित शर्मा, मोहम्मद शमी, नूर अहमद, अल्जारी जोसेफ
दोन्ही संघांचा संपूर्ण स्क्वॉड
मुंबईचा पूर्ण स्क्वॉड: रोहित शर्मा, कॅमरुन ग्रीन, राघव गोयल, विष्णु विनोद, नेहल वढेरा, टिम डेविड, पीयूष चावला, ड्वेन यानसन, शम्स मुलानी, रमनदीप सिंह, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, अरशद खान, कुमार कार्तिकेय, ऋतिक शौकीन, बेहरनडॉर्फ, डेवाल्ड ब्रेविस, जोफ्रा आर्चर, अर्जुन तेंडुलकर, आकाश मधवाल, इशान किशन आणि ट्रिस्टन स्टब्स.
गुजरातचा पूर्ण स्क्वॉड : हार्दिक पंड्या, अभिनव मनोहर, शुभमन गिल, डेविड मिलर, मॅथ्यू वेड, ऋद्धिमान साहा, बी साई सुदर्शन, दर्शन नालकंडे, जयंत यादव, प्रदीप सांगवान, राहुल तेवतिया, शिवम मावी, विजय शंकर, अलजारी जोसफ, मोहम्मद शमी, नूर अहमद, साई किशोर, राशिद खान, यश दयाल, केन विलियमसन, जोशुआ लिटिल, ओडीन स्मिथ, उर्विल पटेल, केएस भरत आणि मोहित शर्मा.