RCB vs CSK | चेन्नई सुपर किंग्सचा आरसीबीवर हायस्कोअरिंग सामन्यात सामन्यात 8 धावांनी विजय

चेन्नई सुपर किंग्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर रंगतदार झालेल्या सामन्यात 8 धावांनी विजय मिळवला आहे. आरसीबीला चेन्नईकडून घरच्या मैदानात पराभव स्वीकारावा लागला.

RCB vs CSK | चेन्नई सुपर किंग्सचा आरसीबीवर हायस्कोअरिंग सामन्यात सामन्यात 8 धावांनी विजय
Follow us
| Updated on: Apr 18, 2023 | 12:26 AM

बंगळुरु | आयपीएल 16 व्या मोसमातील 24 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने हायस्कोअरिंग मॅचमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर 8 धावांनी विजय मिळवला आहे. चेन्नईने आरसीबीसमोर विजयासाठी 227 धावांचे डोंगराएवढं आव्हान ठेवलं होतं. आरसीबीने विजयासाठी जोरदार प्रयत्न केले होते. कॅप्टन फाफ डु प्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेल या दोघांच्या शतकी भागीदारीमुळे सामन्यात रंगत आली होती. मात्र ग्लेन आणि फाफ दोघेही आऊट झाल्यानंतर कोणत्याही फलंदाजाला मॅचविनिंग खेळी साकारण्यात अपयश आलं. आरसीबीला 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 218 धावाच करता आल्या.

आरसीबीची बॅटिंग

आरसीबीकडून ग्लेन मॅक्सवेल याने सर्वाधिक 36 बॉलमध्ये 3 चौकार आणि 8 सिक्सच्या मदतीने 76 धावांची खेळी केली. कॅप्टन फाफ डु प्लेसिस 33 बॉलमध्ये 62 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 4 सिक्स आणि 5 चौकार ठोकले. दिनेश कार्तिक याने 28, सुयश प्रभुदेसाई याने 19, शहबाज अहमद याने 12 धावांची खेळी केली. विराट कोहली अपयशी ठरला. विराट 6 धावा करुन तंबूत परतला. वेन पार्नेल आणि वानिंदू हसरंगा या दोघांनी प्रत्येकी 2 धावा केल्या. तर महिपाल लोमरुर याला भोपळाही फोडता आला नाही.

चेन्नईकडून तुषार देशपांडे याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. मथिक्षा पथीराणा याने 2 फलंदाजाना माघारी पाठवलं. तर आकाश सिंह, महीश थीक्षणा आणि मोईन अली या तिकडीने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

चेन्नईची बॅटिंग

त्याआधी आरसीबीने टॉस जिंकून चेन्नईला बॅटिंगसाठी भाग पाडलं. चेन्नईकडून डेव्हॉन कॉनवे याने 83 धावांची खेळी केली. शिवम दुबे याने 27 चेंडूत 52 धावांचं वेगवान अर्धशतक इनिंग साकारली. अजिंक्य रहाणे याने 37 रन्स केल्या. मोईन अली याने नाबाद 19 धावा केल्या. अंबाती रायुडूने 14 आणि रविंद्र जडेजाने 10 धावा केल्या. ऋतुराज गायकवाड या सामन्यात अपयशी ठरला. गायकवाड 3 रन्स करुन तंबूत परतला. तर धोनी 1 धावेवर नाबाद राहिला. आरसीबीकडून मोहम्मद सिराज, वेन पार्नेल, विजयकुमार वैशाख, ग्लेन मॅक्सवेल, वानिंदु हसरंगा आणि हर्षल पटेल या सर्वांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची प्लेइंग इलेव्हन | फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, महिपाल लोमरर, ग्लेन मॅक्सवेल, शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हर्षल पटेल, वानिंदू हसरंगा, वेन पारनेल, विजयकुमार विशाक आणि मोहम्मद सिराज.

चेन्नई सुपर किंग्ज प्लेइंग इलेव्हन | महेंद्रसिंह धोनी (कर्णधार/विकेटकीपर), डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे, मोईन अली, अंबाती रायुडू, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, मथीशा पाथीराना, तुषार देशपांडे आणि महेश थीक्षना.

'पुतळ्याचे पैसे राणेंच्या निवडणुकीसाठी...', ठाकरे गटातील नेत्याचा आरोप
'पुतळ्याचे पैसे राणेंच्या निवडणुकीसाठी...', ठाकरे गटातील नेत्याचा आरोप.
'संजय राऊत कपटी अन् रावणाच्या बुद्धिमत्तेचा माणूस', शहाजीबापूंची टीका
'संजय राऊत कपटी अन् रावणाच्या बुद्धिमत्तेचा माणूस', शहाजीबापूंची टीका.
अजित पवारांनी आपल्याच नेत्याला खडसावलं? पण कारण नेमकं काय?
अजित पवारांनी आपल्याच नेत्याला खडसावलं? पण कारण नेमकं काय?.
'अरे पठ्ठ्या लाडकी बहीण' योजना काय तुझ्या..'अजितदादांचा कोणावर निशाणा?
'अरे पठ्ठ्या लाडकी बहीण' योजना काय तुझ्या..'अजितदादांचा कोणावर निशाणा?.
'दम नाही बुआ, नमस्कार'.... अजित पवार मिश्किलपणे नेमकं काय म्हणाले?
'दम नाही बुआ, नमस्कार'.... अजित पवार मिश्किलपणे नेमकं काय म्हणाले?.
'लाडक्या बहिणीची दादांनी दखल घेतली नाही', महिला अजित पवारांवर भडकली
'लाडक्या बहिणीची दादांनी दखल घेतली नाही', महिला अजित पवारांवर भडकली.
'संजय राऊत हे मानसिक रोगी, ते वेड्यासारखं...', भाजप आमदारांचा हल्लाबोल
'संजय राऊत हे मानसिक रोगी, ते वेड्यासारखं...', भाजप आमदारांचा हल्लाबोल.
'तर महागात पडेल हे विसरू नका', राज ठाकरेंचा पाक चित्रपटावरून थेट इशारा
'तर महागात पडेल हे विसरू नका', राज ठाकरेंचा पाक चित्रपटावरून थेट इशारा.
तिरूपती मंदिरात हिंदू नाही तर ख्रिश्चन चेअरमन, कोणी गेला गंभीर आरोप?
तिरूपती मंदिरात हिंदू नाही तर ख्रिश्चन चेअरमन, कोणी गेला गंभीर आरोप?.
तर नाच्यासारखा थयथयाट केला असता, जरांगेंचा छगन भुजबळांवर निशाणा
तर नाच्यासारखा थयथयाट केला असता, जरांगेंचा छगन भुजबळांवर निशाणा.