RCB vs LSG : स्टॉयनिस आणि पूरन यांनी या बॉलरला टार्गेट केलं, पराभवानंतर फाफ डू प्लेसिसने सांगितलं नेमकं कारण!
मॅच संपल्यानंतर बोलताना आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने आपल्या संघातील एका गोलंदाजाचं नाव घेतलं की ज्याला निकोलस आणि स्टॉयनीस या दोघांनी टार्गेट केल्याचं सांगितलं.
मुंबई : आरसीबी आणि लखनऊ मध्ये झालेल्या श्वास रोथून धरायला लावणाऱ्या सामन्यामध्ये लखनऊ संघाने विजय मिळवला. लखनऊने हा विजय दोन या खेळाडूंच्या जोरावर मिळवला म्हटलं तर वावगं ठरणार नाही. यामध्ये मार्कस स्टॉयनिस आणि निकोलस पुरन या दोघांनी केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर संघाने हा विजय साकारला. तर दुसरीकडे आरसीबी ला 212 धावा करूनही सामना वाचवता आला नाही. मॅच संपल्यानंतर बोलताना आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने आपल्या संघातील एका गोलंदाजाचं नाव घेतलं की ज्याला निकोलस आणि स्टॉयनीस या दोघांनी टार्गेट केल्याचं सांगितलं.
सामन्याच्या मध्यापर्यंत खेळ व्यवस्थित सुरू होता. लखनऊ संघाचे खेळाडू एकेरी दुहेरी धाव घेत होते. त्यामुळे 14 ओव्हरपर्यंत खेळ आटोक्यात होता. मात्र शेवटच्या काही ओव्हरमध्ये सामना आमच्या हातातून जावू लागला. स्टॉयनिस आणि पूरन यांनी खरोखर उत्कृष्ट शॉट्स खेळले. दोघांनी हर्षल पटेल याला टार्गेट केलं. मी डावाच्या सुरूवातीला झगडत होतो त्यामुळे विराटला स्ट्राईक देत होतो. मात्र जेव्हा मला अंदाज आला तेव्हा मी आक्रमक खेळायला सुरूवात केल्याचं फाफ ने सांगितलं.
लखनऊ सुपर जायंट्स प्लेइंग इलेव्हन | के एल राहुल (कॅप्टन), कायले मेयर्स, निकोलस पूरन (विकेटकीपर), दीपक हुडा, मार्क्स स्टॉयनिस, कृणाल पंड्या, अमित मिश्रा, रवी बिश्नोई, ए खान, जयदेव उनाडकट आणि मार्क वुड.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु प्लेइंग इलेव्हन | फाफ डू प्लेसिस (कॅप्टन), विराट कोहली, महिपाल लोमरोर, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), एस अहमद, ए रावत, एच पटेल, डेव्हिड विली, मोहम्मद सिराज आणि वेन पारनेल.