IPL 2023 : LSG vs MI | पुन्हा एकदा सिद्ध झालं, सूर्या फेलं तर पलटणसुद्धा फेल, मुंबईचं स्वप्न भंगलं?
सूर्यकुमार यादव याची धमाकेदार बॅटींग त्यानंतरतच मुंबईच्या विजय असं समीकरण होत असलेलं पाहायला मिळत आहे. मात्र सूर्या फेल गेल्यावर पलटणलाही धक्का बसताना दिसत आहे.
मुंबई : आयपीएलच्या 63 व्या सामन्यात मुंबई इंडिअन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स एकमेकांना भिडले. दोन्ही संघांसाठी हा सामना महत्त्वाचा होता. या सामन्यामध्ये लखनऊने विजय मिळवत पॉइंट टेबलमध्ये तिसऱ्या स्थानी झेप घेत प्ले-ऑफमधील आपलंही स्थान भक्कम केलं आहे. मुंबई इंडिअन्स संघाचा लखनऊने 5 धावांनी पराभव केला. मुंबईला मोठा धक्का बसला असून आता प्ले-ऑफमधील जागेसाठी जर तर वर काही गोष्टी अवलंबून असणार आहेत. मुंबईचा पराभव झाला यामध्ये स्टार खेळाडू सूर्यकुमार यादव लवकर बाद झाला होता.
सूर्यकुमार यादव याची धमाकेदार बॅटींग त्यानंतरतच मुंबईच्या विजय असं समीकरण होत असलेलं पाहायला मिळत आहे. यंदाच्या मोसमात सूर्याच्या अर्धशतकी खेळीच्या नंतर संघाने 200 पेक्षा जास्त लक्ष्य असलेल्या धावसंख्येचा पाठलाग यशस्वीपणे केलाय. मागील सामन्यातही सूर्याने शतकी खेळी केली होती. तो सामनाही मुंबईने जिंकला होता. मात्र आज झालेल्या लखनऊविरूद्धचा सामन्यात 7 धावा करून तो परतला आणि पलटणला पराभवाचा सामना करावा लागलाय.
सूर्यकुमार यादव याने पलटणला अनेकवेळा गेलेले सामने काढून दिलेत. एकट्याच्या जोराववर त्याने पद्धतशीर सेट अप लावून संघाला विजय मिळवून दिलाय. मात्र त्यामुळे मुंबईचा बॅटींग लाईन अप सूर्यावरच डिपेंड राहतोय की काय? असा सवाल उपस्थित होत आहे. आजच्या सामन्यातून दिसून आलं आहे की सूर्या फेल गेला की पलटणसुद्धा फेल जात आहे.
मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), कॅमेरून ग्रीन, सूर्यकुमार यादव, नेहल वढेरा, टीम डेव्हिड, हृतिक शोकीन, ख्रिस जॉर्डन, पीयूष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ, आकाश मधवाल
लखनऊ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), दीपक हुडा, प्रेरक मांकड, कृणाल पांड्या (कर्णधार), मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन, आयुष बडोनी, नवीन-उल-हक, रवी बिश्नोई, स्वप्नील सिंग, मोहसिन खान