IPL 2023 : RCB ला मोठा झटका, स्टार बॅट्समनशिवाय खेळाव लागणार

IPL 2023 : सीजन सुरु होण्याआधीच RCB ची टीम संकटात सापडली आहे. हा मॅचविनर खेळाडू नसण्याचा मोठा फटका आरसीबीला बसेल. अनेक मोठे खेळाडू पहिला सामना खेळण्याआधीच आऊट झाले आहेत.

IPL 2023 : RCB ला मोठा झटका, स्टार बॅट्समनशिवाय खेळाव लागणार
RCB Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Mar 26, 2023 | 9:25 AM

IPL 2023 RCB : इंडियन प्रीमिअर लीगचा 16 वा सीजन सुरु होण्याआधीच अनेक टीम्सना दुखापतीचा फटका बसला आहे. अनेक मोठे खेळाडू पहिला सामना खेळण्याआधीच आऊट झाले आहेत. मुंबई इंडियन्सचा जसप्रीत बुमराह याच उत्तम उदहारण आहे. आता विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बँगलोर टीमला दुखापतीचा फटका बसला आहे. मागच्या सीजनमध्ये या टीमने सेमीफायनलपर्यंत धडक मारली होती. आयपीएलच्या प्रत्येक सीजनआधी काही स्टार खेळाडू दुखापतीमुळे आऊट होतात. हा सीजन सुद्धा अपवाद नाहीय.

यंदाचा आयपीएल सीजन सुरु होण्याआधी RCB च्या एका मॅचविनर खेळाडूला दुखापत झालीय. या खेळाडूच्या टीममध्ये नसण्याचा मोठा फटका बसू शकतो.

किती सामन्यांना मुकणार?

रजत पाटीदारने मागच्या सीजनमध्ये रॉयल चॅलेंजर्स बँगलोरकडून जबरदस्त कामगिरी केली होती. यंदाच्या सीजनमध्ये तो निम्म्या सामन्यांमध्ये खेळताना दिसणार नाही. रजत पाटीदाराला टाचेची दुखापत झाली आहे. सध्या रजत पाटीदार राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये (NCA) आहे. तिथे त्याची रिहॅब प्रोसेस सुरु आहे.

दुखापतग्रस्त टाचेचा MRI स्कॅन

रजत पाटीदार RCB टीममध्ये कधी परतणार? त्याची कुठलीही तारीख दिलेली नाही. NCAमध्ये त्याची रिकव्हरी प्रक्रिया सुरु आहे. त्याला विश्रांतीचा सल्ला दिलाय. रजत पाटीदारच्या दुखापतग्रस्त टाचेचा MRI स्कॅन करण्यात येणार आहे. या स्कॅननंतर रजत पाटीदार RCB स्क्वॉडला जॉइन करणार की नाही? ते स्पष्ट होईल.

दुखापत कधी झाली?

RCB टीमला जॉइंन करण्याआधी रजत पाटीदारला ही दुखापत झालीय. IPL 2023 मध्ये सहभागी होण्याआधी त्याला NCA ची मंजुरी लागेल. पाटीदारची दुखापत लक्षात घेता, त्याने वेगाने रिकव्हरी केली, तर तो आयपीएलच्या दुसऱ्या सत्रात तो खेळताना दिसेल. मागच्या सीजनमध्ये किती धावा फटकावल्या?

मागच्या 2022 च्या सीजनमध्ये एलिमिनेटरच्या महत्वाच्या सामन्यात रजत पाटीदारने आयपीएलमधील वेगवान शतक झळकावलं होतं. आयपीएल 2022 च्या मेगा ऑक्शनमध्ये आरसीबीने त्याला विकत घेतलं नव्हतं. पण आरसीबीचा विकेटकीपर लुवनीत सिसोदीयाला दुखापत झाल्यानंतर रजतचा टीममध्ये समावेश करण्यात आला होता. पाटीदारने मागच्या सीजनमध्ये 333 धावा फटकावल्या.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.