IPL 2023 RR v SRH Video: सामन्यात ‘लगान’ चित्रपटाचा तो सीन खराखुरा घडला, शेवटच्या चेंडूवर काय झालं पाहा
आयपीएल 2023 स्पर्धा रंगतदार वळणावर आली आहे. प्रत्येक सामन्याचा निकाल गुणतालिकेचं चित्र बदलत आहे. राजस्थान विरुद्ध हैदराबाद हा सामनाही असाच ठरला. शेवटच्या चेंडूपर्यंत आलेल्या सामन्यात नेमकं काय घडलं पाहा
मुंबई : आयपीएल 2023 स्पर्धेतील सर्वात रोमहर्षक आणि आश्चर्यकारक विजय राजस्थान विरुद्धच्या सामन्यात हैदराबादनं मिळवला. शेवटच्या चेंडूवरपर्यंत रंगलेल्या सामन्यात कोण बाजी मारेल असं चित्र असताना आश्चर्यकारक घटना घडली. शेवटच्या चेंडूवर 6 धावा आवश्यक असताना चमत्कार घडला असंच म्हणावं लागेल. चित्रपटाशिवाय क्रिकेट इतिहासात ही चमत्कारिक घटना आहे. शेवटच्या चेंडूवर 6 धावा आवश्यक असताना संदीप शर्माच्या गोलंदाजीवर अब्दुल समादने उत्तुंग फटका मारला आणि लाँग ऑफवर असलेल्या जोस बटलरने झेल घेतला. यासह त्याने विजय जल्लोष करण्यात सुरुवात केली. पण नियतीच्या मनात वेगळंच होतं.
लगान चित्रपटात शेवटच्या चेंडूवर जसं घडलं होतं अगदी तसंच राजस्थान विरुद्ध हैदराबाद सामन्यात घडलं. झेल घेतलेला चेंडू पंचांना नो घोषित केला आणि विजयी जल्लोष थांबला. मग काय एक चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता असताना अब्दुल समदने उत्तुंग षटकार ठोकत संघाला विजय मिळवून दिला. समद खऱ्या अर्थाने या सामन्यातला भुवन ठरला.
No ball dramaWhole stadium thought the match was wonWHAT A THRILLER #RRvSRH #RRvsSRH #SandeepSharma #AbdulSamad #TATAIPL pic.twitter.com/0ptHiOwAtp
— Vaibhav Sharma (@vaibhav_4x) May 7, 2023
A winning team lost and the losing team won in frames. ?
What a finish by SRH! #RRvsSRH pic.twitter.com/UYNO0Im2qB
— Sexy Cricket Shots (@sexycricketshot) May 7, 2023
What a matchh! Brilliant innings from Abdul Samad & Glenn Phillips. No Ball drama made it hella intense ??#RRvsSRH pic.twitter.com/MoFTKLx0YL
— UrMiL07™ (@urmilpatel30) May 7, 2023
राजस्थानने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. राजस्थानने आक्रमक फलंदाजी करत 20 षटकात 2 गडी गमवून 214 धावा केल्या आणि विजयासाठी 215 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान सनराईजर्स हैदराबादनं शेवटच्या चेंडूवर पूर्ण केलं. या विजयाचा शिल्पकार अब्दुल समद ठरला. या विजयासह हैदराबादच्या प्लेऑफच्या अजूनही कायम आहेत.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
राजस्थान रॉयल्स प्लेइंग इलेव्हन | संजू सॅमसन (कर्णधार आणि विकेटकीपर), यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, जो रूट, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, मुरुगन अश्विन, संदीप शर्मा, कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल.
सनरायजर्स हैदराबाद प्लेइंग इलेव्हन | अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम (कर्णधार), हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, अब्दुल समद, मार्को जॅनसेन, विव्रत शर्मा, मयंक मार्कंडे, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन.