RCB vs LSG : बंगळुरु विरुद्ध लखनऊ सामन्यातील राड्यानंतर दोन्ही फ्रेंचाईसीचं ट्विटर वॉर, कसं डिवचलं ते पाहा

IPL 2023 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यातील सामना जय पराजयापेक्षा वेगळ्याच कारणाने रंगला. सामन्यानंतर झालेल्या राड्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. इतकंच काय तर दोन्ही संघाच्या फ्रेंचाईसीही ट्विटरवर भिडल्या.

RCB vs LSG : बंगळुरु विरुद्ध लखनऊ सामन्यातील राड्यानंतर दोन्ही फ्रेंचाईसीचं ट्विटर वॉर, कसं डिवचलं ते पाहा
RCB vs LSG : सामन्यानंतर गंभीर कोहली भिडल्यानंतर फ्रेंचाईसीचं ट्विटर वॉर सुरु, काय केलं ते पाहा
Follow us
| Updated on: May 02, 2023 | 1:49 AM

मुंबई : आयपीएल 2023 स्पर्धेतील 43 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात पार पडला. हा सामना बंगळुरुने 18 धावांनी जिंकत पहिल्या सामन्यातील पराभवाचा वचपा काढला. पण सामन्याच्या निकालानंतर प्रकरण इथेच थांबलं नाही. तर सामन्यानंतर खेळाडूंमध्ये शाब्दिक राडा पाहायला मिळाला. काही खेळाडू राडा होऊ नये यासाठी प्रयत्न करत होते. तर काही खेळाडू शाब्दिक रित्या अंगावर चाल करून जात होते. खासकरून विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यातील वाद चांगलाच रंगला. आता हा वाद ट्विटरवर ट्रेंड होत आहे. दुसरीकडे या वादात दोन्ही संघाच्या फ्रेंचाईसीही मागे नाहीत. त्यांचं ट्विटरवॉरही आता चर्चेत आहे.

या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात लखनऊने बंगळुरुवर 1 विकेट राखून विजय मिळवला होता. हा सामना 10 एप्रिल 2023 रोजी झाला होता. त्यानंतर लखनऊ सुपर जायंट्सच्या ट्विटरवरून “Ladies And Gentlement, This is how you…PLAY BOLD” असं ट्वीट करण्यात आलं होतं. आता बंगळुरुने लखनऊला पराभूत केल्यानंतर तेच ट्वीट रिट्वीट करत नवं पोस्ट केली आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने “Adab se Haraye! #PlayBold” असं ट्वीट केलं आहे. खासकरून लखनऊचं ट्वीट रिट्वीट करत त्यात हॅशटॅग प्ले बोल्ड असं लिहिलं आहे. त्यामुळे मैदानातील राडा आता ट्विटरवरही पाहायला मिळत आहे.

दुसरीकडे, लखनऊ सुपर जायंट्सचे काही ट्वीट्सही असाच काहीसा इशारे करणारे आहेत. त्यामुळे सुपर फोरमध्ये हे दोन संघ पोहोचले तर आणखी वाद चिघळण्याची शक्यता आहे.

दोन्ही संघाचे खेळाडू

लखनऊ सुपर जायंट्स प्लेइंग इलेव्हन | केएल राहुल (कॅप्टन), कायल मेयर्स, दीपक हुडा, मार्कस स्टोयनिस, कृणाल पंड्या, निकोलस पूरन (विकेटकीपर), कृष्णप्पा गौतम, रवी बिश्नोई, नवीन-उल-हक, अमित मिश्रा आणि यश ठाकूर.

आरसीबी प्लेइंग इलेव्हन | फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, अनुज रावत, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), सुयश प्रभुदेसाई, वानिंदू हसरंगा, कर्ण शर्मा, मोहम्मद सिराज आणि जोश हेझलवुड.

भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार.
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य.
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड.
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.