AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Virat Kohli | शतक एक रेकॉर्ड अनेक, कोहलीचा SRH विरुद्ध ‘विराट’ धमाका

विराट कोहली याला रनमशीन का म्हणतात हे त्याने पुन्हा सिद्ध करुन दाखवलंय. विराटने हैदराबाद विरुद्ध शतक ठोकत अनेक रेकॉर्ड केलेत.

Virat Kohli | शतक एक रेकॉर्ड अनेक, कोहलीचा SRH विरुद्ध 'विराट' धमाका
| Updated on: May 19, 2023 | 4:21 PM
Share

हैदराबाद | आयपीएल 16 व्या मोसमात गुरुवारी 18 मे रोजी सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात सामना रंगला. आरसीबीने या सामन्यात हैदराबादवर एकतर्फी विजय मिळवत प्लेऑफमधील आव्हान कायम राखलं. हैदराबादने विजयासाठी दिलेल्या 186 धावांचं आव्हान आरसीबीने 2 विकेट्सच्या मोबदल्यात 19.2 ओव्हरमध्येच पूर्ण केलं. विराट कोहली हा आरसीबीच्या विजयाचा हिरो ठरला. विराट याने आरसीबीकडून हैदराबाद विरुद्ध सर्वाधिक धावा केल्या. विराटने शतक ठोकत अनेक विक्रम आपल्या नावावर केलेत.

ख्रिस गेलच्या विक्रमाची बरोबरी

विराटने खणखणीत शतक ठोकलं. विराटने 63 बॉलमध्ये 4 सिक्स आणि 12 फोरच्या मदतीने 100 धावांची शतकी खेळी केली. विराटचं हे या मोसमातील पहिलं आणि आयपीएल कारकीर्दीतील एकूण सहावं शतक ठरलं. विराटने यासह ख्रिस गेल याच्या विक्रमाची बरोबरी केली. ख्रिस गेल यानेही आयपीएलमध्ये 6 शतकं ठोकण्याचा कारनामा केलाय.

रोहित शर्मा-केएल राहुलला पछाडलं

विराटच्या एकूण टी 20 कारकीर्दीतील हे 7 वं शतक ठरलंय. विराटने यासह रोहित शर्मा आणि केएल राहुल या दोघांना मागे टाकलंय. विराट आणि केएल या दोघांच्या नावावर प्रत्येकी 6 शतकांची नोंद आहे.

सर्वाधिक धावांचा विक्रम आणखी भक्कम

विराट कोहली याने आयपीएल इतिहासात 7 हजार 500 धावांचा टप्पा गाठला. विराट आयपीएलमध्ये अशी कामगिरी करणारा पहिलाच फलंदाज ठरला आहे. विराटने एका शतकासह असे अनेक विक्रम आपल्या नावावर केले. आरसीबीसाठी हैदराबाद विरुद्धचा सामना प्लेऑफच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा होता. या मस्ट विन सामन्यात विराट कोहलीने आपला धमाका दाखवत आरसीबीला विजय मिळवून दिला.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु प्लेइंग इलेव्हन | फाफ डु प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, अनुज रावत (विकेटकीपर), शाहबाज अहमद, मायकेल ब्रेसवेल, वेन पारनेल, हर्षल पटेल, कर्ण शर्मा आणि मोहम्मद सिराज

सनरायजर्स हैदराबाद प्लेइंग इलेव्हन | एडन मार्करम (कॅप्टन), अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), हॅरी ब्रूक, ग्लेन फिलिप्स, अब्दुल समद, कार्तिक त्यागी, मयंक डागर, भुवनेश्वर कुमार आणि नितीश रेड्डी.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.