IPL 2023, SRH vs RR | राजस्थनाची ‘यशस्वी’ बॅटिंग, हैदराबादला 204 रन्सचं टार्गेट
आयपीएलच्या 16 व्या मोसमात आज रविवारी 2 एप्रिल रोजी सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात हैदराबादमधील राजीव गांधी स्टेडियममध्ये सामना खेळवण्यात येत आहे.
हैदराबाद | आयपीएल 16 व्या मोसमातील दुसऱ्या डबल हेडरमधील पहिला सामना हा सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात सुरु आहे. या सामन्यात राजस्थानने हैदराबादला विजयासाठी 204 धावांचं तगडं आव्हान दिलं आहे. राजस्थानने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 203 धावा केल्या. राजस्थानकडून कॅप्टन संजू सॅमसन, यशस्वी जयस्वाल आणि जॉस बटलर या तिकडीने अर्धशतकी खेळी केली. या तिघांनी अनुक्रमे 55, 54 आणि 54 धावा केल्या.
सॅमसन, जयस्वाल आणि बटलर या तिघांव्यतिरिक्त देवदत्त पडिक्कल याने 2 धावा केल्या. रियान पराग 7 रन्स करुन माघारी परतला. तर शिमरॉन हेटमायर याने नाबाद 22 धावा केल्या. तर आर अश्विन यानेही नॉट आऊट 1 धाव केली. हैदराबादकडून फजलहक फारुकी आणि टी नटराजन या दोघांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर उमरान मलिक याने 1 फलंदाजाला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.
यशस्वीने 37 बॉलमध्ये 9 चौकारांच्या मदतीने 54 धावांची खेळी केली. यशस्वीचं हे आयपीएलमधील दुसरं अर्धशतक ठरलं. तसेच बटलरने 3 सिक्स आणि 7 फोरसह फक्त 22 बॉलमध्ये 54 धावांची झंझावाती खेळी केली. तर संजूनेही 32 चेंडूत 3 फोर आणि 4 अप्रतिम षटकारांसह 55 धावा केल्या.
हैदराबादला 205 रन्सचं टार्गेट
Innings Break!
A solid batting display from @rajasthanroyals as captain @IamSanjuSamson, @josbuttler & @ybj_19 scored cracking FIFTIES ? ?
Will @SunRisers chase the target down ?
Scorecard ▶️ https://t.co/khh5OBILWy #TATAIPL | #SRHvRR pic.twitter.com/wM7ma5zvzH
— IndianPremierLeague (@IPL) April 2, 2023
एकूण 6 जणांचं पदार्पण
हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स या सामन्यातून एकूण 6 जणांनी आयपीएलमध्ये पदार्पण केलं आहे. हैदराबादकडून 4 आणि राजस्थानकडून 2 खेळाडूंना आयपीएलमध्ये पहिला वैयक्तिक सामना खेळण्याची संधी मिळाली आहे.
हैदराबाद टीमसाठी आदिल रशिद, ग्लेन फिलिप्स, हॅरी ब्रूक आणि मयंक अग्रवाल या चौघांनी पदार्पण केलंय. तर राजस्थानकडून जेसन होल्डर आणि केएस आसिफ या जोडीचं डेब्यू सामना आहे.
हैदराबाद प्लेइंग इलेव्हन | भुवनेश्वर कुमार (कर्णधार), मयंक अग्रवाल, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, हॅरी ब्रूक, ग्लेन फिलिप्स (विकेटकीपर), वॉशिंगटन सुंदर, फजलहक फारुकी, टी नटराजन, उमरान मलिक आणि आदिल रशीद.
राजस्थान रॉयल्स प्लेइंग इलेव्हन | संजू सॅमसन (कॅप्टन/विकेटकीपर), जॉस बटलर, यशस्वी जयस्वाल, देवदत्त पडिक्कल, रियान पराग, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, जेसन होल्डर, ट्रेंट बोल्ट, केएम आसिफ आणि युजवेंद्र चहल.