Video : आयपीएल 2023 स्पर्धेदरम्यान Swiggy Delivery Boy ची करामत, बाइक बघितल्यावर तुम्हीला बोलाल; रुको जरा..!
IPL 2023 स्पर्धेत मैदानात तू तू मै मै पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे मैदानावर चाहत्यांचा वेगळाच अंदाज पाहायला मिळत आहे. असाच एक स्विगी डिलिव्हरी बॉय सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.
मुंबई : आयपीएल 2023 स्पर्धेचा रंग दिवसेंदिवस आणखीन रंगत चालला आहे. हळूहळू प्लेऑफचं चित्र देखील स्पष्ट होताना दिसत आहे. दुसरीकडे आयपीएल चाहत्यांचा वेगळाच अंदाज मैदानाबाहेर पाहायला मिळत आहे. उगीचच भारताला क्रिकेटवेडा देश म्हंटलं जात नाही. एका स्विगी डिलिव्हरी बॉयने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा (आरसीबी) मोठा चाहता असल्याचं दाखवून दिलं आहे. त्याच्या मोटरसायकलचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या मोटरसायकलवर विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्सचे स्टिकर लावले आहेत. त्यामुळे या डिलिव्हरी बॉयवर येता जाता सर्वांच्या नजरा लागून राहतात.
ट्विटर युजर पुलकिने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्स यांच्या स्टिकर्सने त्याची लाल बाइक सजलेली दिसत आहे. त्याचबरोबर या चाहत्याने “ई सला कप नामदे” असं घोषवाक्यही लिहिलं आहे.
Probably the biggest RCB fan ❤ pic.twitter.com/cqVc6jSE64
— Pulkit?? (@pulkit5Dx) May 2, 2023
बाइकच्या मिररच्या दोन्ही बाजूला आरसीबीचे झेंडे लावले आहेत. तसेच जागोजागी आरसीबीच्या खेळाडूंचे स्टिकर्स लक्ष वेधून घेत आहे. व्हिडीओमध्ये डिलिव्हरी बॉयने एबी डिव्हिलियर्स प्रती आपलं प्रेम व्यक्त केलं आहे. तसेच या पर्वात त्याला मिस करत असल्याचं सांगितलं आहे.
आतापर्यंत हा व्हिडीओ हजारो लोकांनी सोशल मीडियावर पाहिला आहे. तसेच वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडीओ शेअर केला जात आहे. आतापर्यंत 6850 हून अधिक जणांना लाईक केलं आहे. एका युजर्सने कमेंट्समध्ये लिहिलं आहे की, या व्यक्तीला कोणीही वाईट बोलू शकत नाही. कारण गेली 15 वर्षे निस्वार्थीपणे तो आरसीबीवर प्रेम करत आहे. खरा आरसीबी फॅन आहे.
आयपीएल 2023 गुणतालिकेत आरसीबीचा संघ पाचव्या स्थानावर आहे. आरसीबीने खेळलेल्या 10 पैकी पाच सामन्यात विजय तर पाच सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. 10 गुणांसह आरसीबीचा संघ पाचव्या स्थानावर आहे. तर अजूनही चार सामने खेळायचे बाकी आहेत. आरसीबीचा पुढचा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध आहे.
आरसीबीचा संपूर्ण संघ
बंगळुरुचा पूर्ण स्क्वॉड : फाफ डु प्लेसी, विराट कोहली, कर्ण शर्मा, महिपाल लोमरोड, ग्लेन मॅक्सवेल, वानिंदु हसारंगा, आकाश दीप, सुयश प्रभुदेसाई, शाहबाज अहमद, हर्षल पटेल, केदार जाधव, मोहम्मद सिराज, जॉश हेझलवुड, सिद्धार्थ कौल ,हिमांशु शर्मा, मनोज भंडागे, अविनाश सिंह, राजन कुमार, सोनू यादव, रजत पाटीदार, दिनेश कार्तिक, अनुज रावत, फिन एलेन आणि रीस टॉपले.