Virat Kohli : लखनऊला झोडल्यावर किंग विराट कोहलीची ती पोस्ट तुफान व्हायरल, म्हणाला…
लखनऊ संघाची धुलाई झाल्यावर विराट कोहलीने पोस्ट केल्यावर ती व्हायरल होणारच की? याचं वेगळं कारण तुम्हाला सांगायची गरज नाही. गौतम गंभीर आणि विराट कोहली यांची भांडणं जवळपास सर्व क्रिकेट विश्वाने पाहिली आहेत.
मुंबई : गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यातील सामन्यामध्ये गुजरात संघाच्या खेळाडूंनी जबरदस्त धुलाई केली. प्रथम फलंदाजी करणाऱ्या गुजरातने 227 धावांचं लक्ष्य लखनऊसमोर ठेवलं होतं. यामध्ये सलामीवीर वृद्धीमान साहा याने दमदार खेळी केली. पहिल्या ओव्हरपासून त्याने लखनऊच्या गोलंदाजांवर आक्रमण चालू केलं होतं. त्यासोबतच शुबमन गिलनेही अर्धशतक केलं. दोघांच्या शतकी भागीदारीमुळे लखनऊ संघाला मोठी धावसंख्या उभारता आली होती. मात्र लखनऊ संघाला 177 धावाच करत आल्या. गुजरातने 56 धावांनी मोठा विजय मिळवला आहे.
या सामन्यामध्ये गुजरात संघ बॅटींग करत असताना आरसीबी संघाचा खेळाडू विराट कोहली याने एक पोस्ट केली आहे. विराटची ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असलेली पाहायला मिळत आहे. लखनऊ संघाची धुलाई झाल्यावर विराट कोहलीने पोस्ट केल्यावर ती व्हायरल होणारच की? याचं वेगळं कारण तुम्हाला सांगायची गरज नाही. गौतम गंभीर आणि विराट कोहली यांची भांडणं जवळपास सर्व क्रिकेट विश्वाने पाहिली आहेत.
गुजरात संघाचा सलामीवीर वृद्धिमान साहाने पॉवर प्लेमध्ये जबरदस्त सुरूवात केली. साहाने लखनऊचा बॉलिग अटॅक हानून पाडला. दुपारच्या तळपत्या उन्हात चाळिशी गाठायला आलेल्या साहाने लखनऊच्या गोलंदाजांना जबर फोडलं आहे. अवघ्या 20 चेंडूत त्याने 50 धावा काढत आक्रमक खेळी केली. 43 चेंडूत 81 धावा केल्या यामध्ये त्याने 10 चौकार आणि 4 सिक्सर मारले.
विराटची पोस्ट :
वृद्धिमान साहाचं वय आणि त्याने केलेली बॅटींग पाहून सर्वत्र त्याचं कौतुक होताना दिसत आहे. विराटनेही त्याची बॅटींग चालू असतानाच, What A Player अशा कॅप्शनसह आपल्या घरातील टीव्हीवरील मॅच पाहतानाचा वृद्धिचा फोटो शेअर केला आहे.
दरम्यान, लखनऊ संघाचा 56 धावांनी गुजरात संघाने पराभव करत गुणतालिकेमध्ये पहिलं स्थान मिळवलं आहे. शुबमन गिल नाबाद (94), वृद्धीमान साहा (81) आणि गोलंदाज मोहित शर्माच्या 4 विकेटस हे खेळाडू गुजरातच्या विजयाचे हिरो ठरले. गुजरातने विजयासाठी 228 धावांच टार्गेट दिलं होतं. लखनऊला 20 ओव्हर्समध्ये 7 बाद 171 धावाच केल्या.